महारेराने आणली बंदी.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST2021-07-31T04:04:01+5:302021-07-31T04:04:01+5:30
महारेराने यादी जाहीर केली आहे. त्यात शहरातील काही गृहप्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, यातील काही बांधकाम व्यावसायिकांनी वेळेपूर्वी बांधकाम पूर्ण ...

महारेराने आणली बंदी.....
महारेराने यादी जाहीर केली आहे. त्यात शहरातील काही गृहप्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, यातील काही बांधकाम व्यावसायिकांनी वेळेपूर्वी बांधकाम पूर्ण करून घरे विकली आहेत. तिथे लोक राहण्यासाठी आले आहेत. त्या गृहप्रकल्पांचे प्रमाणपत्र महारेराला मिळाले नसल्याने त्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. आम्ही यास सकारात्मकतेने बघत आहोत. नियमांचे पालन केले पाहिजे.
नितीन बगडिया
अध्यक्ष, क्रेडाई
----
शहरातील क्रेडाईच्या सदस्यांच्या एक हजार गृहप्रकल्पांची महारेरात नोंदणी केली आहे. प्रकल्पाची किती बुकिंग झाली. किती बांधकाम पूर्ण झाले, याची माहिती दर तीन महिन्यांनी महारेरावर अपलोड केली जाते. एवढेच नव्हे, तर ग्राहकांकडून मिळालेली रक्कम प्रकल्पासाठी किती खर्च केली, याबाबत सीएचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागते. मात्र, ही माहिती अपलोड न केल्याने शुक्रवारी महारेराने जाहीर केलेल्या यादीत त्या प्रकल्पांची नावे आली असावीत.
अखिल खन्ना
सचिव, महारेरा