मतपत्रिकांची हेराफेरी; न्यायालयात घेणार धाव

By | Updated: December 8, 2020 04:01 IST2020-12-08T04:01:28+5:302020-12-08T04:01:28+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिका आणि मोजणी प्रक्रियेवरून अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांच्यासह इतरांनी आक्षेप घेतला आहे. ...

Ballot rigging; Will run to court | मतपत्रिकांची हेराफेरी; न्यायालयात घेणार धाव

मतपत्रिकांची हेराफेरी; न्यायालयात घेणार धाव

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिका आणि मोजणी प्रक्रियेवरून अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांच्यासह इतरांनी आक्षेप घेतला आहे.

मुंडे यांनी दावा केला की, पाच हजारांपेक्षा जास्त मतपत्रिका मतमोजणीदरम्यान कोऱ्या निघाल्या होत्या, तसेच मतपत्रिकेच्या पाठीमागे असणाऱ्या मतदान केंद्राच्या अध्यक्षांच्या सहीत सातत्याने बदल आढळून आले. हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात येताच निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रारदेखील केली होती. केंद्रेकर यांनी तातडीने त्याबाबत उत्तर दिले; परंतु त्यावर काही समाधान झाले नाही. त्यामुळे याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतमोजणीच्या दिवशी मुंडे यांच्यासह कुणाल खरात, सचिन ढवळे, रोहित बोरकर, विशाल नांदरकर यांनी याबाबत आवाज उठविला होता. मात्र, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रेकर यांनी दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू असून, मतमोजणी थांबविणे शक्य नसल्याचे उमेदवारांना सांगितले होते.

न्यायालयात धाव घेण्याची तयारी

मुंडे यांनी सांगितले की, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर झालेले मतदान व मतमोजणीच्या वेळी झालेली मोजणी यामध्ये तफावत आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. इतर उमेदवारदेखील सोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Ballot rigging; Will run to court