शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

बाळासाहेबांचा आदर्श राज ठाकरेंच्यासमोर; त्यांच्या खांद्यावर खेळून ते मोठे झाले- बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:02 IST

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली.

औरंगाबाद- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन सभेला नक्कीच परवानगी देतील, असं  बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. पोलिसांना आम्ही सहकार्य करु, असंही त्यांनी सांगितलं. तसेच बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श राज ठाकरेंच्या समोर आहे. त्यांच्याच खांद्यावर खेळून राज ठाकरे मोठे झाले. मात्र बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत आणि राज ठाकरे हे राज ठाकरे आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले. 

मनसेच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू झाल्याचे वृत्त आले होते. मात्र औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी काल दिली होती. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. 

महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमातून त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी इतिहास समजून घ्यावा, असं शरद पवार सभेतील भाषणात म्हणाले.

परवा एका नेत्याने मुंबईत भाषण दिलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की, शरद पवार हे सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूराजे यांचेच नाव का घेतात, असं म्हणत माझी विनंती आहे त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राचे सामाजिक परिवर्तन यासंबंधी अतिशय उत्तम लेखन केलं. ते जर वाचलं, तर अशा प्रकारचे प्रश्न कोणी विचारणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरAurangabadऔरंगाबाद