सिल्लोड येथे साकारणार बाळासाहेब ठाकरे चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:32+5:302021-02-05T04:09:32+5:30

सिल्लोड : श्री महादेव मंदिरासमोरील चौकात सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चौक साकारण्यात येत आहे. ...

Balasaheb Thackeray Chowk to be constructed at Sillod | सिल्लोड येथे साकारणार बाळासाहेब ठाकरे चौक

सिल्लोड येथे साकारणार बाळासाहेब ठाकरे चौक

सिल्लोड : श्री महादेव मंदिरासमोरील चौकात सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चौक साकारण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते या चौकाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, सुदर्शन अग्रवाल, नॅशनल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक मारुती वराडे, विशाल जाधव, डॉ. दत्तात्रय भवर, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सत्तार हुसेन, शेख इम्रान ऊर्फ गुड्डू, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन,सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर,सोसायटी चेअरमन राजेंद्र बन्सोड, संजय मुरकुटे, दादासेट पंडित, शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृतलाल पटेल, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, रवी रासने, आशिष कुलकर्णी, संतोष धाडगे, दशरथ बरडे, रवी गायकवाड, सुनील सनान्से, दीपक वाघ, राहुल बोराडे, जमीर मुलतानी, शेख शमीम, गौरव सहारे, फहीम पठाण, बाबुराव दुधे,एकनाथ शिंदे, सतीश सिरसाट आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Web Title: Balasaheb Thackeray Chowk to be constructed at Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.