बॅलेन्सची पळवापळवी

By Admin | Updated: May 7, 2015 00:58 IST2015-05-07T00:37:11+5:302015-05-07T00:58:40+5:30

शिरीष शिंदे, बीड बाजारपेठाचा राजा हा ग्राहक असतो असे मानले जाते. सामान्य व्यक्ती हा प्रत्येक कंपनीचा केंद्रबींदू असतो.

Balance Raid | बॅलेन्सची पळवापळवी

बॅलेन्सची पळवापळवी



शिरीष शिंदे, बीड
बाजारपेठाचा राजा हा ग्राहक असतो असे मानले जाते. सामान्य व्यक्ती हा प्रत्येक कंपनीचा केंद्रबींदू असतो. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या लहान-लहान स्किम सुरु करुन त्यांना आकर्षीत करण्याच्या प्रयत्न करतात. मात्र मोबाईलमध्ये असलेल्या सीमकार्ड कंपन्या ग्राहकांना विविध योजनेद्वारे कार्ड घेण्यास भाग पाडतात मात्र ते सुरु केल्यानंतर सुरु होते ‘आॅनलाईन लूट’. बीड शहरासह इतर तालुक्यातील सीमकार्डच्या ‘प्री-पेड’ ग्राहकांचा विविध कंपन्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा सर्व्हे ‘लोकमत’ने बुधवारी केला. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या अनेक नकारात्मक प्रश्नांना ग्राहकांनी होकार देत असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्याचे सांगत तोंडी उदाहरणेही दिली. यातून सीमकार्डधारक कंपन्या सर्व सामान्य ग्राहकांच्या खिशातून अगदी सहज पैसे काढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोबाईल क्रांतीमुळे संवाद अत्यंत सुकर झाला आहे. आज मोठ्या उद्योगपतीपासून ते सायकल रिक्षा वाल्यांच्या हातात मोबाईलचे साधन आले आहे. मोबाईलमुळे संपर्क होणे अगदी सहज शक्य झाल्याने त्याचा प्रचार व प्रसार झपाट्याने झाला. मोबाईल शिवाय संवाद होणे कठीण झाल्याने सर्व सामान्यांजवळ हे साधन उपलब्ध झाले. सीमकार्ड कंपन्यांना सुगीचे दिवस आले. पुर्वी ‘प्री-पेड’ सीमकार्ड सुरु झाली व कालांतराने पोस्टपेड ला सुरुवात झाली. स्टेटस सिंम्बॉल व रिर्चाजच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी पोस्टपेड कनेक्शनकडे पाहिले जाऊ लागले. पोस्टपेडचे बील अधिक येते ही जाण असल्याने अनेकजण प्रीपेड सीमकार्ड घेतात. त्यांची संख्या पोस्टपेड ग्राहकांच्या तुलनेत अधिक आहे. पैसे सेवा देण्यापुर्वी घेतले जातात मात्र त्या तुलनेत सेवा मिळत नाही ही बाब सर्व्हेक्षणातून समोर आली. सर्व सामान्यांची सीमकार्ड कंपन्याकडून सर्रास लुट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चांगल्यात चांगली सेवा देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या प्रत्यक्षात ग्राहकांना कशा प्रकारे मनस्ताप देतात ? हे या निमित्ताने समोर आले आहे.
इंटरनेटची स्पीड तुम्ही रिजार्च केलेल्या डाटा प्लॅन प्रमाणे मिळते का ? या प्रश्नास उत्तर देत ८४% लोकांनी योग्य स्पीड मिळत
नसल्याचे सांगितले तर उर्वरीत १६ टक्के लोकांनी
योग्य स्पीड मिळत नाही. त्यामुळे वैताग येत
असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.
समस्या आल्यास कस्टमर केअरशी कॉल केल्यास अडचणी येत असल्याचे सांगणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे तर अडचणी येत नसल्याचे सांगणाऱ्यांचे प्रमाण २० टक्के आहे.
मोबाईलवरून बोलताना आवाज गायब होतो असे ७०% टक्के लोक सांगतात. आवाज जात नसल्याचे सांगण्यांची संख्या १० % तर कधीकधी आवाज जात असल्याचे सांगण्यांची संख्या २०% आहे.
मोबाईलच्या कव्हरेजबाबत अनेकांच्या तक्रारी असल्याचे सर्व्हेक्षणाद्वारे समोर आले. तर काही ठिकाणी कव्हरेज रेंज येत जात असल्याचे सांगण्यात आले. कव्हरेजचा प्रॉबलेम असल्याचे ५६% लोकांनी सांगितले तर समस्या नसल्याचे १६ % जणांनी सांगितले. टॉवर येत जात असल्याची समस्या सांगण्यांचे प्रमाण २८% आहे.
मोबाईलमध्ये बॅलेन्स अचानक गायब होते या प्रश्नाशी ४१% लोकांनी सहमती दर्शवली तर बॅलेन्स जात नसल्याचे ३० टक्के लोकांनी सांगितले. कधीकधी बॅलेन्स जात असल्याचे सांगणारे २९ टक्के असल्याचे समोर आले.
मोबाईलवरुन बोलणाऱ्यांची संख्या वाढत आहे तर त्या तुलनेत कॉल डिसकनेक्ट होणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. या प्रश्नाशी सहमत होणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. तर कॉल कधीकधी डिसकनेक्ट होत असल्याचे सांगण्यांऱ्यांचे प्रमाण केवळ २० टक्के आहे.

Web Title: Balance Raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.