बजाज हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केला १ कोटी ४१ लाखांचा अपहार
By Admin | Updated: November 5, 2016 01:33 IST2016-11-05T01:17:56+5:302016-11-05T01:33:04+5:30
औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील बिलिंग सेक्शनमध्ये कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांनीच

बजाज हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केला १ कोटी ४१ लाखांचा अपहार
औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील बिलिंग सेक्शनमध्ये कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांनीच १ कोटी ४१ लाख ९७ हजार १२२ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल झाल्टे, ज्ञानेश्वर डोके, रमेश राठोड आणि राजेश गायकवाड, अशी आरोपींची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, आरोपी हे गतवर्षीपर्यंत बजाज हॉस्पिटलच्या बिलिंग सेक्शनमध्ये कार्यरत होते. रुग्णांच्या औषधोपचाराचे बिल तयार करण्याचे आणि बिलाची रक्कम वसूल करून ती रुग्णालयात जमा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांची होती. रुग्णालयात कार्यरत असताना ते रुग्णांना उपचाराचे बिल तयार करून देत. या बिलाची दुय्यम प्रत रुग्णालयाच्या रेकॉर्डवर ते ठेवत नव्हते. एवढचे नव्हे तर बिलिंग सिस्टीममध्येही बिलाची रक्कम जमा करीत नव्हते. रुग्णालयाने आॅडिट करून घेतले तेव्हा ही बाब लक्षात आली. ६१७ केसेसमध्ये रुग्णांकडून ९९ लाख २४ हजार ७७ रुपये घेऊन ते हॉस्पिटलच्या बिलिंग सेक्शनला जमा न करता रकमेचा अपहार केला. ६३६ केसेसमध्ये ४२ लाख ७३ हजार ४५ रुपये असे बिल वसूल केले गेले. मात्र हे बिलदेखील जमा न करता १ कोटी ४१ लाख ९७ हजार १२२ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील रेल्वेपटरीशेजारी राहणाऱ्या किराणा दुकानदाराचे ६ लाख ५ हजार रुपये चोरीला गेले. एवढी मोठी रक्कम चोरीला गेल्याची घटना मुकुंदवाडी पोलिसांना सांगितल्यानंतरही पोलिसांनी साडेचार लाख रुपये चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
याविषयी पोलीस निरीक्षक कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले की, रक्कम कधी आणि किती चोरीला गेली, याबाबतची अचूक माहिती तक्रारदाराकडे नाही. दुकानदार घरात ठिक,ठिकाणी कपड्यात बांधून पैैसे ठेवतो. त्यास कोणत्या ठिकाणी किती रक्कम ठेवली होती, हे सांगता येत
नाही.