बहुजन क्रांती दल वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:01+5:302021-02-05T04:17:01+5:30
कँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे कसले पुरोगामी? त्यांच्या व्हेंटिलेटरवर शिवसेना जिवंत आहे. औरंगाबादला संभाजीनगर हे नाव मान्य नसेल तर ...

बहुजन क्रांती दल वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन
कँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे कसले पुरोगामी? त्यांच्या व्हेंटिलेटरवर शिवसेना जिवंत आहे. औरंगाबादला संभाजीनगर हे नाव मान्य नसेल तर या दोन्ही पक्षांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. तिघांनाही भावनिक प्रश्नांचे भांडवल करून मतांची पोळी भाजून घ्यायची आहे, असा आरोप फारूख अहमद यांनी केला. एल्गार परिषदेत उस्मानी यांनी केलेले वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करूनही योग्य नाही. कोणताही समाज चांगला किंवा वाईट नसतो; पण केवळ शब्दांवर जाऊन राजकारण करण्यापेक्षा त्यामागील वेदनाही समजून घेणे आवश्यक असते, असे फारुख म्हणाले. आता मी वंबआमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, असे मिलिंद दाभाडे यांनी सांगितले. कृष्णा बनकर,प्रा. सुनील वाकेकर, सिद्धार्थ मोकळे आदींची पत्रपरिषदेस उपस्थिती होती.