बागवान समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
By Admin | Updated: April 16, 2016 01:38 IST2016-04-16T01:23:12+5:302016-04-16T01:38:31+5:30
जालना : जालना जिल्हा बागवान पंच कमिटीच्यावतीने दुसऱ्या सामूहिक विवाह डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडला.

बागवान समाजाचा सामूहिक विवाह सोहळा
जालना : जालना जिल्हा बागवान पंच कमिटीच्यावतीने दुसऱ्या सामूहिक विवाह डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडला. या सोहळ्यात आठ जोडपे विवाहबध्द झाले.
सोहळ्याची कार्यवाही काजी सय्यद नुरोद्दीन, सय्यद बिलाल, मौलाना गुलाम जिलानी, हाफिज रिजवान, कारी रऊफ यांनी पार पाडली. या सोहळ्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. कैलास गोरंट्याल, एकबाल पाशा, फेरोजलाला तांबोळी, रशिद पहेलवान, सुभाष देठे, अजित कोठारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. खोतकर म्हणाले की, आजच्या महागाईच्या काळात सामूहिक विवाहाच्या माध्यमातून लग्न समारंभातील मोठा खर्च वाचण्यास मदत होते.
बागवान समाज गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम राबवित असल्याने संयोजकांचे कौतुक करून यापुढेही हा उपक्रम सुरूच ठेवावा , आ. खोतकर यांनी सांगितले.
सोहळा यशस्वितेसाठी हाजी मन्सूर बागवान, आरेफ बागवान, युनूस बागवान, नईम बागवान, जहीर बागवान, फईम बागवान,प्रा. इफतेखारोद्दीन, शकील बागवान, सत्तार बागवान, रियाज बागवान, अमजदखॉ बागवान, कदिर बागवान, महेबूब बागवान, अकबर बागवान, विकार बागवान, अलीम बागवान, सोहेल बागवान, असिम बागवान, फिरोज बागवान यांच्यासह विविध विभागांच्या कमिट्यांच्या पदाधिकारी परिश्रम घेतले. सोहळ्यास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)