'बडेबाप के बेटेबद्दल काही देणेघेणे नाही'; खा. ओवेसी आर्यन खान प्रकरणावर स्पष्टच बोलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 17:53 IST2021-10-30T17:50:51+5:302021-10-30T17:53:25+5:30
MP Asaduddin Owaisi on Aryan Khan: सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो.

'बडेबाप के बेटेबद्दल काही देणेघेणे नाही'; खा. ओवेसी आर्यन खान प्रकरणावर स्पष्टच बोलले
औरंगाबाद : 'बडे बाप के बेटे' बद्द्ल आपल्याला काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट मत एमआयएम (AIMIM ) प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी (MP Asaduddin Owaisi on Aryan Khan ) यांनी आज आर्यन खान प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केले. आगामी काळातील निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी खा. ओवेसी औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी खुलताबाद येथे राज्यभरातील प्रमुख नेते,पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यानंतर खा. ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खा. ओवेसी पुढे म्हणाले, सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. अन हरलो की लक्ष ठरतो तो मोहम्मद शमी. चीकडूनही सीमारेषेवर कुरापती सुरुच आहेत. गेल्या १८ महिन्यांपासुन लडाखचा भुप्रदेश चीनच्या ताब्यात आहे. याबाबत खासरांचे शिष्टमंडळ नेऊन परिस्थिती पाहण्याची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहोत, असेही ते म्हणाले.
तर शिवसेना- भाजप एकत्र येतील
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार असा आहे. आता विरोधात असलेले शिवसेना आणि भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र दिसतील अशी भविष्यवाणी खा. ओवेसी यांनी केली. महाविकास आघाडी सरकाने २ वर्षे पूर्ण केली तरी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत ते उदासीन आहेत.
२७ नोव्हेंबरला चलो मुंबई
महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर आवाज उठविण्यासाठी २७ नोव्हेंबरला मुंबईत मोठी सभा घेणार असल्याचे खा. ओवेसी यांनी जाहीर केले. 'चलो मुंबई' चा नारा देत वाहनांवर तिरंगा ध्वज लावून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील. यासभेस ओवेसी बंधू मार्गदर्शन करून मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधू असेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी औरंगाबादचे खा.इम्तीयाज जलील, धुळ्याचे फारूख अन्वर शहा , मालेगावचे आ. आमदार मुफती ईस्माईल ,माजी आ. वारीस पठाण, गफ्फार कादरी यांची उपस्थिती होती. प्रारंभी सकाळी १० वाजता राज्यातील प्रमुख शहरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिका-यांची जिल्हानिहाय बैठक घेवून पक्षसंघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विश्रामगृह परिसरास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.