घाटी रुग्णालयातून बाळाची चोरी, सुदैवाने बाळ मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:06 IST2021-02-23T11:04:22+5:302021-02-23T11:06:47+5:30
Baby kidnapping from Government Hospital Ghati Aurangabad आरोपी महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात

घाटी रुग्णालयातून बाळाची चोरी, सुदैवाने बाळ मिळाले परत
ठळक मुद्देमातेने आरडाओरड करताच बाळाचा शोध घेण्यात आलाएका रिक्षाचालकाने पाहिले आरोपी महिलेस
औरंगाबाद: घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागाच्या एका नवजात शिशुची चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला. सुदैवाने काही वेळातच या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला पकडण्यात आले.
घाटीतील वार्ड -३० मध्ये दाखल एका महिलेचे बाळ पळवण्यात आले. ही बाब कळतात आईने आरडाओरडा केला. त्यानंतर बाळाचा शोध घेण्यात आला. तेव्हा एका रिक्षाचालकाने एका महिलेकडे बाळ पाहिल्याचे सांगितले. त्यावर बाळ पळविणाऱ्या महिलेला पकडून बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.