शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या खर्चासाठी गुन्हेगारांसोबत मैत्री करून बीएच्या विद्यार्थ्याने घेतले दुचाकी चोरीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:31 IST

छत्रपती संभाजीनगरातील जवाहरनगर पोलिसांनी पकडले त्रिकूट; विकलेल्या १४ दुचाकी हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीवरील खर्चासाठी नशेच्या आहारी गेलेल्या बी.ए. च्या विद्यार्थ्याने गुन्हेगारांसोबत मैत्री करून दुचाकी चोरीचे धडे घेतले. गेल्या पाच महिन्यांत विविध ठिकाणांवरून १४ दुचाकी चोरून त्यांनी प्रेयसी व नशापाणीवर पैसे उडवले. जवाहरनगर पोलिसांनी यात तपास करत समर्थ विनोद काळे (२२, मूळ रा. राजाबाजार, ह. मु. सिल्लेखाना), पवन परमेश्वर चौधरी (१८, रा. बेगमपुरा) आणि सोहेल शैकद बेग (२७, रा. छावणी) या त्रिकुटाला अटक करत सर्व दुचाकी हस्तगत केल्या.

शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याची स्थिती आहे. १७ नोव्हेंबर रोजी अमोल डाके (रा. खातगाव) हे गजानन महाराज परिसरातील एका रुग्णालयात आले असताना भरदिवसा त्यांची दुचाकी चोरीला गेली. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या सूचनेवरून अंमलदार अनिल भाले, मारोती गोरे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरांचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यात रेकॉर्डवरील दुचाकी चोर समर्थ कैद झाला. त्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अधिक तपासात त्यांना पहिले पवनची ओळख पटली व त्यांनी थेट त्याच्या घरातून मुसक्या आवळत नंतर त्याच्या माध्यमातून समर्थलाही पकडले. अंमलदार मारोती गोरे, अनिल भाले, इंदलसिंग महेर, संदीप बिलारी, प्रवीण कापरे, मंगेश घुगे, सतीष सानप, विजय सुरे यांनी ही कारवाई केली.

दुचाकीचे कागदपत्र मिळवून विक्रीचौकशीत पवन, समर्थने चोरलेल्या दुचाकी ते सोहेलला विक्री करत असल्याची कबुली दिली. छावणीचा रहिवासी असलेला सोहेल त्यांच्याकडून १५ ते २५ हजारांत दुचाकी घेऊन समोर ५० ते ६० हजारांत विक्री करायचा. विशेष म्हणजे, आरटीओतून दुचाकीचे कागदपत्रांच्या झेरॉक्सही मिळवायचा. पोलिसांनी मात्र त्याची खातरजमा केली नसल्याचे सांगितले. एपीआय कॉर्नर परिसरातील लॉजमध्ये मुक्काम ठोकून सोहेल ग्राहकांना भेटायचा. काही दुचाकी त्याने मालेगावला विक्री केल्या आहेत. सोहेल होकार देईपर्यंत चोरलेल्या दुचाकी समर्थ व पवन निर्मनुष्य परिसरात लपवून ठेवायचे.

वडिलांनी घराबाहेर काढलेसमर्थवर यापूर्वी पाच ते सहा गुन्हे नोंदवलेले आहेत. त्याच्या वागण्याला कंटाळून वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. ते कुरीअरच्या गाड्या चालवतात. तर पवनची व त्याची नशा करताना परिचय झाला. त्यानंतर खर्चासाठी तो समर्थसोबत दुचाकी चोरायला लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : BA Student Turns Bike Thief for Girlfriend's Expenses, Arrested

Web Summary : A BA student, addicted to drugs and needing money for his girlfriend, learned bike theft. He and two accomplices stole 14 bikes, selling them through a contact who forged documents. Police arrested the trio and recovered the stolen vehicles.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर