फुलांचा खर्च टाळून मदत सौर ऊर्जा प्रकल्प होणार

By Admin | Updated: October 17, 2016 01:20 IST2016-10-17T00:59:37+5:302016-10-17T01:20:50+5:30

औरंगाबाद : १ मे २०१७ पर्यंत देशातील ७ हजार ४२६ गावांत वीजपुरवठा करण्यात येईल. आजवर १० हजार ४१२ गावे अंधारमुक्त झाल्याचा दावा

Avoid floral expenses, help in solar power projects | फुलांचा खर्च टाळून मदत सौर ऊर्जा प्रकल्प होणार

फुलांचा खर्च टाळून मदत सौर ऊर्जा प्रकल्प होणार


औरंगाबाद : १ मे २०१७ पर्यंत देशातील ७ हजार ४२६ गावांत वीजपुरवठा करण्यात येईल. आजवर १० हजार ४१२ गावे अंधारमुक्त झाल्याचा दावा केंद्रीय नविनीकरण ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १ हजार दिवसांत ग्रामीण भारत अंधारमुक्त करण्याचे धोरण असून, त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यात लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची हमी त्यांनी दिली.
भारतातील १८ हजार ४५२ गावांमध्ये वीज नव्हती. २००९ पासून २०१४ पर्यंत उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांत १०० गावांमध्ये वीजपुरवठा झाला. दुर्गम भागांतील गावांना वीजपुरवठा करणे हे अशक्यप्राय होते. परंतु या ७०० दिवसांच्या कारभारात केंद्र शासनाने देशातील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये वीजपुरवठा केला आहे. देशातील ६१४ गावे अशी आहेत की, जेथे नागरी वास्तव्य नाही. तर काही ठिकाणी जंगली, पहाडी परिसरामुळे वीजपुरवठा करण्यात अडथळे येतात, असे गोयल यांनी नमूद केले. यावेळी एसजेव्हीएनचे अध्यक्ष आर. एन. मिश्रा, आ. अतुल सावे, डॉ. अनंत पंढरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, किशनचंद तनवाणी, संजय केणेकर यांची उपस्थिती होती.
मराठवाड्यात सौर ऊर्जा प्रकल्प
मराठवाड्यात पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत पूर्ण आढावा घेतलेला नाही. परंतु सौरऊर्जा प्रकल्पासाठी विभागात शासनाने (पान २ वर)
औरंगाबाद : भारतीय युवकांनी त्यांच्यातील क्षमता नवसंशोधनासाठी प्रभावीपणे वापरल्यास देश निश्चित महासत्ता होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी येथे व्यक्त केला. तरुण उद्योजकांनी अनुदानाऐवजी नवसंशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले.
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) तिसऱ्या सीईओ फोरमचे उद्घाटन गोयल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष गुरप्रीतसिंग बग्गा, सचिव दुष्यंत पाटील, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, राम भोगले, सी. पी. त्रिपाठी, श्रीराम नारायणन, उमेश दाशरथी, (पान २ वर)
भीषण दुष्काळी परिस्थितीत लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा निर्णय हा ‘इनोव्हेशन’चे उदाहरणच आहे. सूरतचे नियोजन करणारे सनदी अधिकारी म्हणून श्रीनिवास ओळखले जातात. ४
दिल्ली मेट्रोचे जनक म्हणून श्रीधरन यांची ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, हे सर्व ‘इनोव्हेशन’मध्येच मोडते. सुरुवातीला अशक्य वाटणारी गोष्ट सकारात्मक विचार व नवकल्पनांमुळे सहज साध्य होते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.
कोणत्याही कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छांवर मोठा खर्च होत असतो. हा खर्च टाळून खर्चाची रक्कम सामाजिक संस्थेस प्रदान करण्याचा उपक्रम ‘सीएमआयए’ने हाती घेतला आहे. दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या नवजीवन सोसायटीच्या अध्यक्षा नलिनी शहा यांना गोयल यांच्या हस्ते यावेळी मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Web Title: Avoid floral expenses, help in solar power projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.