शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शहरातून प्रतिदिन सरासरी तीन वाहनांची होतेय चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:47 IST

गुन्हे उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प

ठळक मुद्देगतवर्षीपेक्षा यंदा वाहन चोऱ्या वाढल्यागरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी 

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण ६ महिन्यांपासून वाढल्याचे दिसते आहे. औरंगाबाद शहरातून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरटे पळवीत आहेत. वाढत्या वाहन चोऱ्यांचा थेट फटका मध्यमवर्गीय आणि गरिबांना बसत आहे. वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याने या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे आणि त्यांच्या चल, अचल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १७ ठाणे आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. एवढे मोठे पोलीस बल असताना गतवर्षीच्या तुलनेत शहरातील वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

मागील ६ महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतून प्रतिदिन सरासरी ३ वाहने चोरीला जात आहेत. यात सर्वाधिक  दुचाकी आहेत. गतवर्षी २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ७४५ वाहने चोरीला गेल्याची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ १६९ वाहने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र वाहन चोरी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसतेय. 

यावर्षी जानेवारी ते जूनअखेरपर्यंत तब्बल ४५० वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत, तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत हा आकडा ३०५ एवढा होता. गतवर्षी याच कालावधीत चोरीला गेलेल्या वाहनांची संख्या १८० होती. गतवर्षी एप्रिलमध्ये ५२ वाहने चोरीला गेली, तर यावर्षी हा आकडा ७५ वर पोहोचला. 

गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या वाहनांवर चोरट्यांची वक्रदृष्टी सार्वजनिक वाहतुकीची अपुरी व्यवस्था आणि रिक्षाचा महागलेला प्रवास परवडत नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांना दुचाकी बाळगणे अनिवार्यच झाले आहे. कर्ज घेऊन अथवा पोटाला चिमटा घेऊन जमविलेल्या पैशातून मोटारसायकल खरेदी केली जाते. यात काही जण नवीन तर काही लोक जुनी दुचाकी खरेदी करतात. 

मोठे पोलीस बल तरीही वाहन चोऱ्या वाढल्याशहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, स्वतंत्र गुन्हे शाखा, १७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत; परंतु सिडको, एमआयडीसी सिडको आणि गुन्हे शाखेकडून गुन्हे उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अन्य ठाणेदार केवळ गुन्ह्याची नोंद घेऊन मोकळे होतात, असे दिसते. परिणामी, वाहन चोऱ्यांना ब्रेक लावणे दिवसेंदिवस अशक्यच होत आहे.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस