औरंगाबादचा आकाश भारतीय तलवारबाजी संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:42 IST2018-03-25T00:41:44+5:302018-03-25T00:42:33+5:30
औरंगाबाद येथील प्रतिभावान खेळाडू आकाश कल्याणकर याची इटली येथे १ ते १० एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक कॅडेट व ज्युनिअर आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. याआधीही आकाश कल्याणकर याने बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.

औरंगाबादचा आकाश भारतीय तलवारबाजी संघात
औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रतिभावान खेळाडू आकाश कल्याणकर याची इटली येथे १ ते १० एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक कॅडेट व ज्युनिअर आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. याआधीही आकाश कल्याणकर याने बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.
भारतीय संघात निवड झालेल्या आकाश कल्याणकर याने याआधी राष्ट्रीय स्पर्धेत चार व २२ राज्यस्तरीय स्पर्धांत एकूण १८ पदकांची लूट केली आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. दिनेश वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, संस्कार ज्युनिअर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, गिरीश गाडेकर, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, प्राचार्य सविता नरवाडे, प्रशासक सुषमा मोहिते, अनिकेत जोशी, शरद पवार, भारत कल्याणकर आदींनी अभिनंदन केले आहे.