औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन उजळणार 'एलईडी' लाईट्सच्या प्रकाशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:57 IST2018-02-02T18:55:29+5:302018-02-02T18:57:33+5:30
दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळणार आहे.

औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन उजळणार 'एलईडी' लाईट्सच्या प्रकाशात
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळणार आहे.
पर्यावरणपुरक उपाय आणि वीजेची बचत करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंत देशातील सगळ्याच रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसवण्यात येणार आहेत. ही घोषणा भारतीय रेल्वे मंत्रालयाने केली आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जाबचतीसाठी एलईडी लाईटच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्यातून विजेची बचत करण्याचे लक्ष्य आहे.
रेल्वेनेसुद्धा ऊर्जाबचतीसाठी एलईडी लाईट लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद रेल्वेस्टेशनही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यात येणार आहे. पाच प्लॅटफाॅर्म असून, यातील तीन प्लॅटफॉर्मचा वापर प्रभावीपणे करण्यात येतो. चार,पाच क्रमांकाचे प्लॅटफॉर्म मालगाड्यांसाठी वापरात आहेत. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीचे ट्यूब लावण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील ऊर्जेची बचत होण्याची अपेक्षा आहे.
विजेची बचत करण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. यापूर्वी रेल्वे येण्यापूर्वी पंधरा मिनिटे आधी गेल्यानंतर पंधरा मिनिटे असे केवळ अर्धा तास दिवे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता एलईडी ट्यूब बसविण्यात येत आहेत. या माध्यमातून वीज बचतीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.