शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

औरंगाबादेत ‘देश की बेटी बचाव’चा तरुणाईचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:12 AM

जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सुरत येथे झालेल्या मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देतिन्ही घटनांचा निषेध : पीईएस अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उत्तर प्रदेशमधील उन्नाव, गुजरातमधील सुरत येथे झालेल्या मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फ त राष्ट्रपतींना निवेदन दिले.महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात महाविद्यालयाचे विद्यार्थी बुधवारी एकत्र आले. महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. टाऊन हॉल, आमखास मैदान मार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. मोर्चामध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींनी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील फलक घेतले होते.‘बलात्काऱ्यांना फाशी द्या’, ‘देश की बेटी बचाव’, ‘वुई आर बॉर्न टू बी लाईव्ह, नॉट टू रेप’, ‘आय एम बेटी आॅफ नेशन, आय एम अनसेफ’, ‘ आता कोणाचा नंबर; माझा की तुमचा’ असा मजकूर लिहिलेले हे फलक होते. देशातील बलात्कारांच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसत होते.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर मोर्चाचा समारोप झाला. मोर्चाद्वारे विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या. शासकीय यंत्रणा या प्रकरणात कारवाई करण्यात असक्षम ठरत आहेत.या घटनांमुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशा प्रकारचे अमानवीय कृत्य करणाºयांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सदरील प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविण्यात यावीत, ९० दिवसांत दोषींवर कारवाई व्हावी. त्यांना मृत्युदंडच दिला जावा.कठुआ येथील बलात्काराचे प्रकरण दिल्ली हायकोर्टात चालविण्यात यावे. साक्षीदार, कुटुंब, वकिलांना संरक्षण देण्यात यावे, असे डॉ. ए. पी. वाडेकर, डॉ. आर. एम. सावंत, प्रा. शेख जहूर आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाAurangabadऔरंगाबाद