शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:04 IST

‘लोकमत’इफेक्ट : हर्सूल तलावातून ६, एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली

औरंगाबाद : सिडको-हडकोसह शहराला तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या गंभीर समस्येवर ‘लोकमत’ने ७ मेपासून वृत्त मालिका सुरू केल्यामुळे शासन, प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून हर्सूल तलावातून ६ एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याच्या कामाला सुरूवात झाली. एमआयडीसी प्रशासनाकडून ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात झाली.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावते आहे. एप्रिल महिन्यात पारा ४२ अंशापर्यंत गेल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली. महापालिकेकडून समाधानकारक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचा आक्रोश वाढू लागला. नागरिकांच्या मनातील खदखद ‘लोकमत’ने जाणली. शहरातील पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत ‘हॅलो लोकमत’मध्ये वृत्तमालिकाच सुरू करण्यात आली. नागरिकांनीही ‘लोकमत’च्या या भूमिकेस पाठिंबा दिला. जायकवाडीहून १३० ते १४० एमएलडी पाणी शहरात दररोज येत आहे. त्यानंतरही पाणीटंचाई का? नागरिकांच्या हक्काचे पाणी कोण पळवतय, महापालिकेकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. लाईनमन ठरवेल तिच पूर्वदिशा समजून काम करण्यात येत असल्याबद्दल ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली.

जुन्या शहराला मोठा दिलासाहर्सूल तलावातून महापालिका दररोज फक्त ४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत होती. या पाण्यात १० एमएलडीपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून सोमवारी हर्सूल तलाव ते जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास सुरूवात झाली. पुढील ३ दिवसात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हर्सूल तलावातून अतिरक्त ६ एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल. हे पाणी दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत आणले जाईल. हर्सूल तलावात सध्या मुबलक पाणी असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे.

एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणीमनपाने नियुक्त केलेल्या टँकरच्या कंत्राटदाराकडून एन-५, एन-७, कोटला कॉलनी, नक्षत्रवाडी येथून ९५ टँकर भरण्यात येतात. दररोज ५०० फेऱ्या टँकरच्या होतात. ४ ते ५ एमएलडी पाणी टँकर लॉबी पळवून नेत होती. सर्व टँकर हळूहळू एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यावर शिफ्ट करण्यात येत आहेत. एन-७ येथून टँकर भरणे सध्या बंद केले. सध्या एमआयडीसी १ एमएलडी पाणी देत आहे. लवकरच ४ एमएलडीपर्यंत टँकरसाठी पाणी मनपाला मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई