औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! आज तब्बल १०३ कोरोना रुग्णांची वाढ, सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 20:47 IST2022-01-04T20:46:35+5:302022-01-04T20:47:05+5:30
Corona Virus in Aurangabad: शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे

औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! आज तब्बल १०३ कोरोना रुग्णांची वाढ, सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरु
औरंगाबाद : औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा ( Corona Virus In Aurangabad ) उद्रेक पहायला मिळत असून, जिल्ह्यात मंगळवारी तब्बल १०३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार ३९ झाली आहे. आतापर्यंत एकूण ३६५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांना सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
एन- तीन येथे ३, एन-दोन येथे १, एन-पाच येथे १, एन-४ येथे १, पडेगाव १, मुजीब कॉलनी १, एनआरएच वसतिगृह परिसर १, चेतनानगर १, टिळकनगर २, बन्सीलालनगर १, हर्सुल १, वेदांतनगर १, कांचनवाडी १, देवाळाई २, दर्गा रोड १, बीड बायपास १, बायजीपुरा १, उत्तमनगर १, शिवाजीनगर १, टि.व्ही. सेंटर १, सिल्क मिल्क कॉलनी १, उस्मानपुरा १, म्हाडा कॉलनी १, वेदांतनगर २, अरिहंतनगर १, न्यू बालाजीनगर १, कांचनवाडी २, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी १, सुतगिरीणी चौक १, मिलीट्री हॉस्पीटल १, अन्य ५१
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद तालुका २, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ७, वैजापूर २, पैठण १