शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बचत गटाच्या महिलांना एक लाखाचं कर्ज देणार; मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 4:48 PM

आजचा दिवस मराठवाड्यासाठी क्रांतिकारी

औरंगाबाद : बचत गटामुळे महिलांनी गावांना आर्थिक ताकद दिली आहे.परिणामी देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. ही चळवळ अधिक बळकट करायची आहे. यासाठी बचत गटातील महिलांना १ लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. ते  ऑरिक हॉल, कमांड कंट्रोल सेंटर, रोड सिस्टिम नेटवर्क, लॅण्ड सिस्टम आणि अ‍ॅमेनिटीजच्या लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी बचत गटाच्या सक्षम महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

देशाच्या ओद्योगिक गतीचे नवकेंद्र हे औरंगाबाद होत असून येणाऱ्या काळात येथे अनेक उद्योग सुरु होतील. याच्या माध्यमातून मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा आशावादही मोदी यांनी येथे व्यक्त केला. ऑरिक सिटीच्या कंट्रोल रुमच्या लोकार्पणाचा आजचा दिवस मराठवाड्यासाठी क्रांतिकारी आहे. ऑरिक सिटीमध्ये मोठ्याप्रमाणावर उद्योग येत आहेत. यात मोठी गुंतवणूक होत असून यातून मराठवाड्यात रोजगार उपलब्ध होत आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्त करणारी वॉटर ग्रीड योजना कौतुकास्पद आहे. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल असेही प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. मात्र, मराठवाड्यासाठी आणि येथील उद्योगांसाठी कोणतीही मोठी घोषणा यावेळी झाली नाही. 

शेकडो महिलांना शेंद्रा चौकात अडवले प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला बचत गटाच्या मेळाव्याला जवळपास १ लाख महिलांची उपस्थिती आहे. तसेच शेकडो महिला कार्यक्रमस्थळी दाखल होत होत्या. कार्यक्रम स्थळी पार्किंगची जागा नसल्याने अनेक गाड्या शेंद्रा चौकात पोलिसांनी थांबवून ठेवल्या आणि त्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, त्यातील महिला प्रधानमंत्री मोदींच्या सभेला जाण्याचा आग्रह करत तेथेच थांबल्या. शेवटी पोलिसांनी त्यांना तेथून सभास्थळी पायी जाण्याची परवानगी दिली.   

विमानतळावरून हेलिकॉप्टरने शेंद्र्याकडे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी २.१५ आगमन झाले. दुपारी २.२८ वाजता विमानतळावरून ते वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने शेंद्रा येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.विमानतळावर महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर मनपा आयुक्त निपुण विनायक, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती. 

काय आहे ऑरिक सिटी ?३० लाखांपर्यंत रोजगारनिर्मितीचे लक्ष्य येथील उद्योगनगरीतून आहे. देशातील अत्याधुनिक सुविधांचे नवीन औद्योगिक शहर म्हणजे ऑरिक असेल. ऑरिकमध्ये ऑटोमोबाईल्स क्षेत्र विकसित करण्यासाठी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना सवलती देण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. उद्योग येण्यासाठी ज्या सवलती दिल्या जाव्यात. त्यासाठी उपसमिती गठित केली आहे. त्या समितीलादेखील अधिकार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने डीएमआयसीसाठी ८ हजार कोटींच्या निधीबाबत मागेच निर्णय घेतला आहे. ३ हजार कोटींचा निर्णय २०१५ मध्येच झाला होता. अंदाजे ८०० कोटींचा निधी ऑरिकसाठी मिळालेला आहे. पहिला टप्पाच अजून पूर्ण झालेला नाही. ऑक्टोबर २०१८ पर्यंत शेंद्रा नोडचे काम पूर्ण होणार होते; परंतु ते झाले नाही. बिडकीनमधील काम २०१८ मध्ये सुरू झाले आहे. २०२० मध्ये पहिला टप्पा, २०२१ मध्ये दुसरा टप्पा, २०२२ मध्ये तिसरा टप्पा, असे काम होणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीMarathwadaमराठवाडाbusinessव्यवसाय