शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

औरंगाबाद शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 3:56 PM

सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ कशामुळे आली?

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. परिणामी लाखो औरंगाबादकरांना उन्हाळ्याचा कडाका सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. सामान्यांच्या पाण्यावर कोण डल्ला मारीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गुंतले आहेत, तर प्रशासन वितरण व्यवस्थेवर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात धरून बसल्याचा आरोप होतो आहे.

वर्षभरापासून कचऱ्याच्या समस्येने शहर गांजले आहे, तर दहा वर्षांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला नागरिक सामोरे जात आहेत. ११५ वॉर्डांपैकी ५० टक्के वॉर्डातही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेची वितरण व्यवस्था कुठे तरी सदोष असल्याची टीकेची झोड सर्वत्र उठत आहे. मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी शहर पाणीपुरवठ्यावर बोलताना सांगितले, येथील पाण्याचे हिशेब असे कसे काय होतात. गळती आणि चोरींवर मात करीत ११० एमएलडी पाणी येते. शहराला १६० एमएलडी पाण्याची गरज आहे.

११० मधून १०० एमएलडी जरी आले तरी हे  पाणी १६ ते १७ लाख लोकसंख्येला एकदाच पुरणे शक्य नाही. त्यामुळे दिवसाआड किंवा दोन दिवसांआड म्हटले तरी २०० एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत शहराची तहान भागू शकते, हा साधा हिशोब आहे. पाणी जायकवाडीतून तर रोज उपसले जात आहे. मग शहरात सात ते आठ दिवसांनी पाणी का येत आहे. काही ठिकाणी रोज येते, कुठे तीन दिवसांनी येते. असे वर्तमानपत्रातून छापून येते.

पालिकेचे वितरणाचे हिशेब का चुकत आहेत. सामान्य नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य नाही. मनपाचा तांत्रिक माणूस कोण आहे, त्याला याबाबतचा अभ्यास का नाही. जलकुंभांचा आढावा का घेतला जात नाही. झोननिहाय जलकुंभ भरावेत आणि त्यातून पाणी वितरित करावे. नऊ झोनअंतर्गत किती जलकुंभ आहेत. त्याचा आढावा घेऊन वितरण का होत नाही.

पाण्याचे गणित चुकतेय कुठे व कसे दोन दिवसांत २२० एमएलडी पाणी येते. १६० एमएलडी जर शहराला दोन दिवसांत मिळाले तरी ६० एलएलडी पाणी शिल्लक राहते. ते पाणी ज्या वसाहतींत नळ नाही, तिकडे देता येते. झोनवाईज जलकुं भांचा, लोकसंख्येचा विचार करावा. साध्या माणसाला कळणारे हे गणित पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला का कळत नाही. ११० एमएलडी रोज पाणी येते. ते पण दिवसाआड किंवा दोन दिवसांआड द्यायचे आहे. जायकवाडीतील पाणी दीड ते दोन वर्षे पुरेल. पाणी असताना सामान्य नागरिकांचा असा छळ होणे अयोग्य आहे. झोननिहाय लोकसंख्या आणि पाणी वितरणाचा हिशोब झाल्यास ताबडतोब चोरी होते की गळती हे समोर येईल. आकाशवाणीवर पाण्याची गरज आणि कुटुंब यावर भाषण देण्यापेक्षा पूर्ण औरंगाबादचा कुटुंब म्हणून का विचार होत नाही. जबाबदारी यंत्रणाप्रमुखांनी याकडे जास्तीचे लक्ष दिले पाहिजे, असेही नागरे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी