औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे
By Admin | Updated: May 22, 2014 00:33 IST2014-05-22T00:28:06+5:302014-05-22T00:33:03+5:30
पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़
औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे
पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़ सिकंदराबाद-मनमाड या रेल्वे मार्गावर धावणार्या प्रवाशांची संख्या वाढली असून, विशेषत: मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्या भाविकांची संख्या जास्त आहे़ सद्यस्थितीतील रेल्वे गाड्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये अपुर्या पडत असल्यामुळे तिरुपतीला जाणार्या भाविकांची गैरसोय होत आहे़ ही अडचण लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती (गाडी क्रमांक ०७४०५) औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३ वाजता सोडण्यात येणार आहे़ सिकंदराबादमार्गे जाणार्या या रेल्वे गाडीच्या मार्गावरील सर्वच प्रमुख स्थानकावर थांबा देण्यात आला आहे़ ही रेल्वे गाडी नांदेड रेल्वेस्थानकावर सायंकाळी ७़३० वाजता पोहचणार आहे़ या विशेष रेल्वे गाडीला १५ डब्बे राहणार असून, वातानुकूलित डब्बा जोडण्यात आला आहे़ परतीचा मार्ग २४ मे रोजी तिरुपती- औरंगाबाद (गाडी क्रमांक ०७४०६) तिरुपती रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५़१० वाजता सुटणार आहे़ ही गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर २५ मे रोजी सकाळी ९ वाजता पोहचणार आहे़ या दोन्ही गाड्यांमुळे तिरुपतीला जाणार्या- येणार्या भाविकांची सोय होणार आहे़ (प्रतिनिधी) भाविकांची गैरसोय झाली दूर सध्या मराठवाड्यातून तिरुपती बालाजीला भाविक मोठ्या संख्येने रेल्वेने जात आहेत़ अपुर्या रेल्वे संख्येमुळे भाविकांची गैरसोय होऊ लागली होती़ त्यामुळे रेल्वे विभागाने एक विशेष रेल्वे गाडी सोडल्याने भाविकांची गैरसोय दूर झाली आहे़ यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे़