औरंगाबादचा स्वप्नील महाराष्ट्राच्या संभाव्य ट्वेंटी-२0 संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:07 IST2017-12-23T01:05:45+5:302017-12-23T01:07:05+5:30
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नुकत्याच झालेल्या निमंत्रित सिनिअर संघांच्या क्रिकेट स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवणारा औरंगाबादचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण याचा महाराष्ट्राच्या ट्वेंटी-२0 संभाव्य संघात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी दिली.

औरंगाबादचा स्वप्नील महाराष्ट्राच्या संभाव्य ट्वेंटी-२0 संघात
औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नुकत्याच झालेल्या निमंत्रित सिनिअर संघांच्या क्रिकेट स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवणारा औरंगाबादचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण याचा महाराष्ट्राच्या ट्वेंटी-२0 संभाव्य संघात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी दिली.
या संघात महाराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार अंकित बावणे, डावखुरा शैलीदार फलंदाज विजय झोल, अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडे या मराठवाड्यातील खेळाडूंचाही संभाव्य संघात समावेश आहे.
या संघाचे सराव शिबीर पुणे येथे होत आहे. अंतिम संघ हा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे होणाºया निवड चाचणी स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. ट्वेंटी-२0 चे क्रिकेट सामने ७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती एमसीएचे सचिव रियाज बागवान यांनी दिली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे झालेल्या निमंत्रित सिनिअर संघांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान फलंदाज स्वप्नील चव्हाण याने सेक्रेटरी इलेव्हनचे प्रतिनिधित्व करताना ६५ पेक्षा जास्त धावसरासरीने चार सामन्यांत २६४ धावा फटकावल्या होत्या. त्यात त्याने तुल्यबळ असणाºया पीवायसी संघाविरुद्ध १३२ चेंडूंतच १४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १३५ आणि डीव्हीसीए संघाविरुद्ध ६0 चेंडूंतच ८ चौकार व एका षटकारासह ७७ धावांची अप्रतिम खेळी करताना सेक्रेटरी इलेव्हन संघाला शानदार विजय मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी स्वप्नीलचे अभिनंदन करीत त्याला शुभेच्छा दिल्या.