शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या विशेष पथकाकडून ्रवखार महामंडळाची झाडाझडती!

By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST

जालना : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गैरकारभार सुरू असून समस्यांचा ढिगारा असल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते.


जालना : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गैरकारभार सुरू असून समस्यांचा ढिगारा असल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. याची गंभीर दखल घेत विभागीय व्यवस्थापकांनी गुरूवारी पथक पाहणीसाठी पाठविले होते. या पथकाने विविध विभागांची पाहणी करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी ‘म्होरक्यां’ची मात्र चांगलीच धांदल उडाली.
जालना शहरापासून जवळच असलेल्या वखार महामंडळात बुधवारी ‘लोकमत’ने स्टींग करून कारभार चव्हाट्यावर आणला होता. या वखार महामंडळात असणाऱ्या १८ गोदामांची ३३ हजार ५८० मेट्रीक टन एवढी साठवणूक क्षमता आहे. परंतु त्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे उघडकीस आले होते. येथे असणारे सुरक्षा रक्षक हे सुस्त होते तर याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती बुधवारी दिसून आली होती. साठा अधीक्षक मात्र खाजगी लोकांच्या वळचणीला गेल्याचे दिसून आले होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक बाहेरील लोकांचाच हस्तक्षेप होत असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले होते. अधिकाऱ्यांच्या या हालगर्जीपणामुळे सामान्यांच्या जिवीतास धोका पोहचण्याची भिती व्यक्त होत आहे. अशा या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखल घेत वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी.देवकते यांनी विशेष पथक या गोदामांच्या तपासणीसाठी पाठविले होते. या पथकाने सुरूवातील बस स्थानकाजवळील गोदामांना भेट दिली. त्यानंतर हे पथक राजूर मार्गावरील गोदामांच्या तपासणीसाठी दाखल झाले. पथक आल्याचे समजताच येथील म्होरक्यांनी धूम ठोकली. पथक पाहणी अहवाल देवकते यांना सादर केला जाणार असून पाहणीत काय आढळले याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, अहवाल सादर झाल्यानंतर वरिष्ठांकडून काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)