औरंगाबादचे रजिस्ट्री कार्यालय ‘ऑफलाईन’; सर्व्हरमध्ये डाटा जास्त झाल्यामुळे कामाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:15 IST2018-06-05T19:15:03+5:302018-06-05T19:15:36+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे सहा महिन्यांपासून डाऊन आहे.

Aurangabad Registry Office 'Offline'; Due to excessive data in the server, the speed of the work is slowed down | औरंगाबादचे रजिस्ट्री कार्यालय ‘ऑफलाईन’; सर्व्हरमध्ये डाटा जास्त झाल्यामुळे कामाची गती मंदावली

औरंगाबादचे रजिस्ट्री कार्यालय ‘ऑफलाईन’; सर्व्हरमध्ये डाटा जास्त झाल्यामुळे कामाची गती मंदावली

ठळक मुद्देमुख्यालयापासून खालपर्यंत सर्व यंत्रणा सर्व्हर अपडेट करण्यात गुंतलेली आहे. 

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक व नोंदणी शुल्क (रजिस्ट्री) कार्यालयातील सर्व्हर स्पेस नसल्यामुळे सहा महिन्यांपासून डाऊन आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यभरात हीच अवस्था असल्याची माहिती समोर आली असून, सर्व्हर अपडेट होण्यासाठी अजून किती कालावधी लागणार असा प्रश्न आहे. 

नोटाबंदीनंतर औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील जमीन खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०१७ च्या मध्यान्हापर्यंत व्यवहार सुरळीत झाले नव्हते. अजूनही शेतजमिनीच्या व्यवहाराचे प्रमाण नगण्य आहे. रोखीच्या व्यवहारावर अनेक निर्बंध आल्यामुळे जमिनींचे भाव गडगडले आहेत. जमिनीच्या व्यवहारांना अजूनही चालना मिळत नाही. अशातच जे थोडे-फार व्यवहार सुरू आहेत, त्यातही आॅनलाईनचे विघ्न येत आहे. रजिस्ट्री करण्यासाठी येणाऱ्या अनेकांची त्यामुळे तारांबळ होत असून, एका रजिस्ट्रीसाठी तासन्तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. मागील पूर्ण आठवड्यात सर्व्हर डाऊन होते. या आठवड्यातही सर्व्हर डाऊनच असल्यामुळे दस्त नोंदणीच्या कामाला गती येत नाही. 

तालुकास्तरावरील सर्व कार्यालये रजिस्ट्री आॅफिसशी आॅनलाईन जोडलेले आहेत. तसेच विभागातील दोन जिल्हेही कनेक्ट आहेत. औरंगाबाद कार्यालय पुणे कार्यालयाशी जोडलेले आहे. राज्यभर आॅनलाईन डाटा संकलनाचे काम मंदावल्यामुळे दस्त नोंदणीवर त्याचा परिणाम झाला आहे. सहा महिन्यांपासून परिस्थिती पूर्वपदावर येईल. पूर्ण स्पीडने आॅनलाईन दस्त नोंदणी होईल, असा दावा कार्यालयाकडून केला जात आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दस्त नोंदणीला वेळ लागतो आहे. मुख्यालयापासून खालपर्यंत सर्व यंत्रणा सर्व्हर अपडेट करण्यात गुंतलेली आहे. 

कोळेकर यांची बदली 
विभागातील मुद्रांक व नोंदणी शुल्क वरिष्ठ अधिकारी जी. एस. कोळेकर यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यभराचा हा प्रश्न आहे. च्मुख्यालयातूनच सर्व्हर डाऊन झालेले आहे. ते अपडेट करण्याबाबत लवकरच प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान कोळेकर यांची पुण्याला बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर डीडीआर म्हणून दीपक सोनवणे हे रुजू झाले आहेत.

Web Title: Aurangabad Registry Office 'Offline'; Due to excessive data in the server, the speed of the work is slowed down