शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

दीड कोटींचा मालमत्ता कर थकल्याने ‘वायएसके’ला पालिकेने ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:56 IST

थकबाकीमुळे कर वसुली अभियान सुरू असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केले. 

ठळक मुद्देभोगवटा शुल्काचे प्रकरणही अनेक वर्षांपासून आहे प्रलंबितविरोधातील राजकीय पडसादाची चर्चा

औरंगाबाद : महापालिकेने भाजप पदाधिकाऱ्याच्या निगडित असलेल्या भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या (वायएसके कॅम्पस) प्रशासकीय कार्यालयांना शुक्रवारी सील ठोकले. १ कोटी ५१ लाख ५७ हजार २६४ रुपयांच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे मनपाने कळविले आहे. तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या अनुषंगाने सदरील संस्थेकडे थकीत असलेली रक्कम दंडासह वसूल करण्याचेही प्रकरण प्रलंबित आहे. एवढी मोठी रक्कम एखाद्या संस्थेकडे असताना मनपा आजवर राजकीय दबावामुळे शांत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेतील शिवसेना-भाजप विरोधातील राजकीय पडसाद अशा पद्धतीने उमटू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

थकीत रकमेपैकी ९ लाख ७७ हजार ६९२ रुपये भरण्यात आले आहेत. व्यवस्थापकाचे दालन, फार्मसी कॉलेजचे कार्यालय, प्रशासकीय कार्यालय मनपाने सील केले आहे. मुलींचे वसतिगृह सील केले नाही. असे वॉर्ड ‘फ’चे अधिकारी महावीर पाटणी यांनी सांगितले. तसेच भोगवटा प्रकरणातील थकबाकी आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत नगररचना विभागाकडे माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कर थकबाकीचा आकडा साडेपाचशे कोटींच्या घरात आहे तर यंदाची थकबाकी तब्बल दीडशे कोटी रुपये एवढी आहे. ३०० कोटी रुपयांची मनपाला देणी आहे. मालमत्ता कर वसुली, भोगवटा शुल्क वसुलीविना पालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात रक्कम येणार नाही. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी कर वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवारी प्रभाग कार्यालय ‘फ’चे वॉर्ड अधिकारी पाटणी यांच्या पथकाने भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार कार्यालयांना सील ठोकले. थकीत रक्कम भरण्यासाठी वारंवार मागणी करूनही संस्थेने मनपाला टोलविले. त्यामुळे कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजप पदाधिकाऱ्याशी निगडित संस्था भगवान शिक्षण प्रसारक मंडळ भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या नातेवाईकांच्या संबंधित आहे. या कारवाईप्रकरणी कराड यांनी महापौरांशी फोनवरून संपर्क केल्याचे वृत्त आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई ही प्रशासकीय कारवाई आहे. यात राजकीय सूडाचा विषय नाही. थकबाकीमुळे कर वसुली अभियान सुरू असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद