शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

औरंगाबाद मनपाने कंत्राटदारांची थकविली ९० कोटींची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 13:18 IST

महापालिका प्रशासनाने मागील पाच महिन्यांपासून कंत्राटदारांची बिले थांबवून ठेवली आहेत. कंत्राटदारांची थकबाकी ९० कोटींपर्यंत पोहोचली आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने मागील पाच महिन्यांपासून कंत्राटदारांची बिले थांबवून ठेवली आहेत. कंत्राटदारांची थकबाकी ९० कोटींपर्यंत पोहोचली आहे. विकास कामे ठप्प होतील या भीतीपोटी शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शासन अनुदानातून कंत्राटदारांची बिले काढण्यात यावीत. मालमत्ता कर वसुलीतून कर्मचाऱ्यांचा पगार करावा, असा आदेश प्रशासनाला दिला आहे. 

महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ६०० ते ७०० कोटी रुपये येतात. यंदा अर्थसंकल्प चक्क १८०० कोटींचा तयार केला आहे. अर्थसंकल्पातील विकास कामांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. नगरसेवकांच्या विनंतीला मान देऊन कंत्राटदारही खिशातील पैसे लावून कामे करीत आहेत. एप्रिल महिन्यापासून मनपाने कंत्राटदारांची बिले थांंबवून ठेवली आहेत.  छोट्या कंत्राटदारांचे हाल होत आहेत. शनिवारी महापौरांनी विभागनिहाय आढावा घेतला. लेखा विभागाचा आढावा घेताना महापौरांनी नमूद केले की, या महिन्यात २० कोटींच्या अनुदानातून कंत्राटदारांची बिले अदा करावीत. कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, लाईट बिल, अत्यावश्यक खर्च मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभागाकडून येणाऱ्या निधीतून करावा. शहरात विकास कामे करायची असतील, तर कंत्राटदारांना  थांबवता येणार नाही. 

खर्चाचा डोंगर वाढलाशहरात ४० हजार एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. या कंपनीला दररोज दहा लाख रुपये मनपाला द्यावे लागतात. याशिवाय बचत गटांचा पगार मनपा कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक वाढवून ठेवण्यात आला आहे. महापालिकेला दरमहा ३० लाख रुपये अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. समांतर जलवाहिनी कंपनी भविष्यात आल्यास दररोज १७ लाख रुपये मनपाला कंपनीस द्यावे लागतील. खर्चाचा डोंगर प्रचंड वाढत असताना उत्पन्नाचे स्रोत जशास तसे आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीMONEYपैसा