शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपा प्रशासन कर्जासाठी २० मालमत्ता गहाण ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:39 IST

भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाला ९८ कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम कर्जरोखे स्वरूपात उभी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेला दिला आहे. कर्जासाठी महापालिकेच्या २० मालमत्ता गहाण ठेवण्याची तयारी प्रशासनाने दाखविली असून, मंगळवारी मालमत्ता विभागाने २० मालमत्तांची यादीच महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केली. कर्जासाठी नगरसेवकांकडून कडाडून विरोध होत आहे. शुक्रवारी तहकूब सर्वसाधारण सभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे.

ठळक मुद्देभूमिगत गटार योजना : शुक्रवारी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाला ९८ कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम कर्जरोखे स्वरूपात उभी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेला दिला आहे. कर्जासाठी महापालिकेच्या २० मालमत्ता गहाण ठेवण्याची तयारी प्रशासनाने दाखविली असून, मंगळवारी मालमत्ता विभागाने २० मालमत्तांची यादीच महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केली. कर्जासाठी नगरसेवकांकडून कडाडून विरोध होत आहे. शुक्रवारी तहकूब सर्वसाधारण सभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे.भूमिगत गटार योजनेसाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यावरून महापालिकेत वादंग निर्माण झाले आहे. २६ डिसेंबरपासून तीनवेळा सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली. महापालिकेने यापूर्वीच अनेकदा कर्ज घेतले आहे. या कर्जाचे हफ्ते भरणे सुरू आहे. सध्या १३४ कोटी रुपयांचे कर्ज मनपाच्या डोक्यावर आहे. त्यात पुन्हा ९८ कोटींचे कर्ज घेतल्यास महापालिका अडीच कोटी रुपयांमध्ये कर्जबाजारी होईल. भविष्यात समांतर जलवाहिनी, एलईडी आदी मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेच्या तिजोरीतूनच पैसे द्यावे लागणार आहेत. याशिवाय शहरातील ११५ वॉर्डांमध्ये विकासकामे, नियमित डागडुजीची कामे करावी लागणार आहेत. नव्याने कर्ज घेण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजप, एमआयएम, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी घेतली आहे. मनपा प्रशासनाच्या प्रस्तावाला आतापर्यंत नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनीही कर्जासाठी विरोध केला आहे. शिवसेना नेत्यांनी कर्जाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश महापौरांना दिले आहेत. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या महापौरांनी वारंवार सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. आता ही सभा शुक्रवारी होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने महत्त्वाच्या नसलेल्या मालमत्तांची यादी महापौरांना मंगळवारी सादर केली आहे. त्यात वीस मालमत्तांचा समावेश आहे.१00 कोटी रुपयांच्या मालमत्ताजालना रोडवरील औरंगाबाद लॅण्ड मार्क इमारतीमधील सुमारे ३०० चौरस मीटर जागा, जालना रोडवरील मुळे-तापडिया इमारतीमधील १९६ चौरस मीटर जागा, श्रेयनगर येथील तापडिया इमारतीमधील १९६ चौरस मीटरच्या चार जागा, रेल्वेस्टेशन येथे दिशा कोटगिरे इमारतीमधील चार जागा, औरंगपुºयातील सिटी मार्बल इमारतीमधील तळ मजला, पहिला मजला, भरतकुमार परसवाणी यांना भाड्याने दिलेला पहिला मजला, जय टॉवर येथील तळ मजला, मालखरे बिल्डर्स येथील तळ मजला, पहिला मजला आणि नूपुर अपार्टमेंट येथील दुकाने, हॉल अशी एकूण १९ हजार ५०० चौरस मीटर जागा गहाण ठेवण्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेने या जागेचे रेडीरेकनरनुसार दरही काढले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या जागा असल्याचे प्रशासनाने महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.