शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
3
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
4
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
5
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
6
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
7
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
10
Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
11
"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
12
काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
13
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
14
Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
15
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
16
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतरही सौरव गांगुलीला 'या' गोष्टीचा आनंद, म्हणाला...
17
Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
18
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
19
जमीन घोटाळ्याप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा! मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास
20
सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र सुस्साट... एकाच झटक्यात २७५८ रुपयांची तेजी, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कार्बन क्रेडिटने महापालिका होणार मालामाल; करोडे रुपये मिळणार, कसा आहे मास्टर प्लॅन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:23 IST

औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविण्यासाठी मोठे काम केले आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : कार्बन क्रेडिट हा व्यवसाय आता जगभरात वाढू लागला आहे. देशातील काही महापालिकांनी कार्बन उत्सर्जन थांबून कोट्यवधी रुपये कमी येण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद महापालिकेने या संदर्भात पाऊल उचलण्याचे निश्चित केले असून, मागील काही वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविण्याचे प्रमाण मोजले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होईल. कार्बन उत्सर्जनात पैसा कमविण्याचा मान राज्यात सर्वप्रथम औरंगाबाद महापालिकेला मिळेल.

औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविण्यासाठी मोठे काम केले आहे. कोणत्या प्रकल्पात किती कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश आले, याचे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र कन्सल्टन्सी नेमण्यात येते. मोजमाप केल्यानंतर कार्बन क्रेडिट आंतरराष्ट्रीय बाजारात विकता येते. सोन्या-चांदीप्रमाणे याचे दर रोज कमी-जास्त होत असतात. इंदूर महापालिकेने आतापर्यंत अशा पद्धतीचे कार्बन क्रेडिट विकून तब्बल नऊ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या कंपनीचे कार्बन उत्सर्जन जास्त असेल तर त्या कंपनीला खुल्या बाजारातून कार्बन क्रेडिट विकत घ्यावे लागते.

कार्बन क्रेडिट कशावर मिळू शकते?बायोमिथेनाइजेशन प्रकल्पकंपोस्ट खतवृक्षारोपणइलेक्ट्रिक वाहन वापरएलईडी दिव्यांचा वापरपाॅवर प्रोजेक्टसोलर वाॅटर हीटर

सोलर रूफ टॉप प्रक्रिया जटिल; पण...१. कार्बन क्रेडिटसाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक२. जबाबदार प्राधिकरणामार्फतच तपासणी करून घेणे३. कार्बन क्रेडिटच्या संख्येनुसार प्रमाणपत्र मिळते४. आंतरराष्ट्रीय पातळीवर याला विकता येते

औरंगाबाद महापालिकेच्या जमेच्या बाजू- पाच वर्षांत महापालिकेने तब्बल ६० हजार एलईडी दिवे लावले.- खाम नदीपात्राच्या परिसरात वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण.- शहरात अनेक ठिकाणी पडून असलेले बांधकाम साहित्य वापरून खाम नदीतील पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न- महापालिकेकडून रोज तीनशे मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते.- स्मार्ट सिटीची इमारत ग्रीन बिल्डिंग पद्धतीने तयार.- स्मार्ट सिटी आणि मनपाकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सुरुवात.- ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू.- महापालिका स्मार्ट सिटीमध्ये सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती

कार्बन क्रेडिटसाठी जोरदार तयारीनेमके किती कार्बन रोखण्यात महापालिकेला यश आले याचे मोजमाप कधीच झालेले नाही. त्यासाठी अगोदर महापालिकेला त्रयस्थ संस्थेतर्फे मोजमाप करून प्रमाणपत्र मिळवावे लागेल. मिळालेले प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय बाजारात विकता येऊ शकते. काही दिवसांपासून याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आणि महापालिका हे करू शकते, हे लक्षात आल्यानंतर तयारी सुरू आहे. महापालिकेला या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये मिळतील. स्मार्ट सिटीत वाटा टाकण्यासाठी कर्ज घेण्यात आले. हे काही दिवसांमध्ये सहज फेडता येईल.- आस्तिककुमार पांडेय, महापालिका प्रशासक

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका