शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिका : सर्वसाधारण सभेकडून अर्थसंकल्पात ३८८ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:21 IST

महापालिकेने यंदा अर्थसंकल्पात मूळ उत्पन्नाच्या तीनपट उड्डाण घेतली आहे. अवघ्या ७०० कोटींचे उत्पन्न असताना महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने सोमवारी तब्बल १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्दे१८६४ कोटींची भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेने यंदा अर्थसंकल्पात मूळ उत्पन्नाच्या तीनपट उड्डाण घेतली आहे. अवघ्या ७०० कोटींचे उत्पन्न असताना महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने सोमवारी तब्बल १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प दोन हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.या अर्थसंकल्पामुळे पुढील दोन वर्षे महापालिकेला अर्थसंकल्पाची गरजच पडणार नाही. मागील वर्षीचे स्पील ओव्हर आणि यंदाची विकासकामे करण्यातच नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. सोमवारी सकाळी ११.४५ वा. सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी एक तास शिक्षण, कचरा, जयभवानीनगर येथील नाल्याच्या प्रश्नावर चर्चा घेण्यात आली. दुपारी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड सुरू केली. मनपाचे उत्पन्न अवघे ७०० कोटी असताना प्रशासनाने १२७४ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्याचे धाडस कसे केले. यावर प्रशासनाची मोठी कोंडी झाली. प्रशासनाकडे समर्पक उत्तर नसल्याने १.४५ वाजता सभा तहकूब करण्यात आली. दुपारी २.४५ वाजता परत सभेला सुरुवात झाली. तोपर्यंत लेखा विभागाने वाढीव अर्थसंकल्पाच्या प्रश्नातून आपली सुटका करून घेतली होती. तब्बल दोन तास अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या पैलूंवर नगरसेवकांनी चर्चा केली. सहा वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांनी १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ३८८ कोटी रुपयांची वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. १८६४ कोटी ८० लाख जमा आणि १८६३ कोटी २० लाख खर्च असा १ कोटी ६० लाख रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.आयुक्तांकडून १४३ कोटींची मागणीमनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अर्थसंकल्पात हेरिटेजसाठी ३० कोटी, क्रीडांगणे विकसित करण्यासाठी २० कोटी, शिक्षण व आरोग्य विभागासाठी १० कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३ कोटी (वाढीव), पाणीपुरवठा ५० कोटी, लोकसहभाग १० कोटी, प्राणी कल्याण १० कोटी रुपयांची मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे केली. आयुक्तांच्या मागणीनुसार महापौरांनीही १०८ कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील संकल्पछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारणे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, अमरप्रीत चौकात शिल्प उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाचे सुशोभीकरण करणे.काहीही करा उत्पन्न वाढवामहापालिकेचे उत्पन्न वाढविले तरच विकासकामे करता येतील. त्यादृष्टीने काहीही करा उत्पन्न वाढवा, अशा सूचना सर्वसाधारण सभेत प्रशासनाला देण्यात आल्या. मालमत्तांचे सर्वेक्षण करा, एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांना हप्ते पाडून वसुली करा, मनपाचे व्यापारी संकुल, मैदाने, सभागृह रेडिरेकनर दराने भाड्याने द्या, मंगल कार्यालये, खासगी क्लासेस, प्रतिष्ठाने यांना पार्किंगसाठी जागा भाडेतत्त्वावर द्याव्यात, शहरात कोठेही शाळा, बालवाड्या सुरू करण्यासाठी मनपाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करा, होर्र्डिंग, अवैध नळ कनेक्शनसाठी कारवाई करावी आदी सूचना प्रशासनाला महापौरांनी केल्या.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBudgetअर्थसंकल्प 2023Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद