शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘वंचित बहुजन आघाडी-एमआयएम’मुळे औरंगाबाद महापालिकेत युतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 7:15 PM

६५ ते ७० नगरसेवक निवडून येण्याची क्षमता

ठळक मुद्देमूलभूत समस्यांनी शहरवासी अगोदरच  त्रस्त २२ दलित नगरसेवक

औरंगाबाद :  वंचित बहुजन आघाडी-एमआयएमला लोकसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’ करण्याची संधी आघाडीला चालून आली आहे. वर्षभरानंतर महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यामुळे युतीच्या सत्तेला धोका निर्माण झाला आहे. 

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीला कधीच बहुमत मिळाले नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये युतीने अपक्षांच्या मदतीनेसत्ता स्थापन केली. २०१५ मध्ये युतीचे ११३ पैकी फक्त ५१ उमेदवार निवडून आले. सातारा, देवळाईचा समावेश मनपात झाल्यानंतर भाजप, काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळाली. युतीपाठोपाठ सर्वात मोठा पक्ष म्हणून महापालिकेत एमआयएमचा उदय झाला. पक्षाच्या चिन्हावर २४ नगरसेवक निवडून आले. नंतर काहींची हकालपट्टी पक्षातून करण्यात आली. बुढीलेन वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत एमआयएमची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने हिसकावून घेतली. आजही एमआयएमचे संख्याबळ २३ आहे. महापालिकेत काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ५ आहे. दोन्ही पक्षात सहा मुस्लिम नगरसेवकांचा समावेश आहे.

२२ दलित नगरसेवक२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीएसपी, रिपाइं डेमोक्रॅटिक, अपक्ष, अशा विविध पक्ष़ाच्या २२ दलित उमेदवारांनी विजय मिळविला. एमआयएमचे २३, काँग्रेस- राष्ट्रवादीमधील ६ मुस्लिम नगरसेवकांची बेरीज केल्यास २९ जण होतात. त्यात २२ दलित नगरसेवकांचा समावेश केला तर संख्या ५१ पर्यंत जाते. शिवसेना-भाजप युतीएवढीच ताकद दलित, मुस्लिम नगरसेवकांची आहे. 

मिशन ७० ठेवणारएमआयएम-बहुजन वंचित आघाडी आगामी मनपा निवडणुकीत युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण एमआयएमला मनपात घवघवीत यश मिळवून देणारे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी पुन्हा एकदा स्वगृही पोहोचले आहेत. शहरात ७० उमेदवार निवडून आणण्यासाठी जावेद कुरैशी व्यूहरचना आखणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कारण मध्य विधानसभा मतदारसंघात जावेद कुरैशी ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार राहण्याची शक्यता आहे. विधानसभेत यश मिळाल्यावर वंचित आघाडी मिशन मनपा राबविणार आहे.

युती विरोधात मतदारांमध्ये नाराजीमनपात मागील ३४ वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मागील साडेतीन दशकांमध्ये युतीने काय केले, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. नऊ दिवसांनंतर पाणी, शहरात कचऱ्याचे डोंगर, जिकडे तिकडे खड्डे, मूलभूत सोयी- सुविधांची ओरड सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला पाणी, कचरा प्रश्नाचे बरेच चटके सहन करावे लागले.

पक्षीय बलाबलशिवसेना     -    २८भाजप     -    २३एमआयएम    -    २३काँग्रेस     -    १२बीएसपी     -    ०५राष्ट्रवादी काँग्रेस    -    ०५रिपाइं(डेमोक्रॅटिक)    -    ०२अपक्ष    -    १७एकूण    -    ११५

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन