शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

औरंगाबादेत सराफाचे दुकान फोडून सहा किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:03 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सिडको एन-९, एम-२ येथील सराफा दुकानाच्या लोखंडी ग्रिलचा कोंडा तोडून आणि दुकानाचे शटर उचकटून ...

ठळक मुद्देदुकानाचे शटर उचकटून उत्तररात्री साधली चोरट्यांनी संधी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एन-९, एम-२ येथील सराफा दुकानाच्या लोखंडी ग्रिलचा कोंडा तोडून आणि दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे पाच ते सहा किलो चांदीची मोड चोरून नेली. ही घटना गुरुवारी उत्तररात्री ३.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.प्राप्त माहिती अशी की, सिडको एन-९ मधील एम-२ येथील शॉपिंग मार्के टमध्ये मुकेश अशोक सोनार यांचे भक्ती पर्ल आणि ज्वेलर्स हे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर आणि समोरील लोखंडी ग्रिलच्या गेटला कुलूप लावून ते घरी गेले. रात्री ३.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या लोखंडी ग्रिलचा कोंडा तोडला. त्यानंतर आतील शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात सीसीटीव्ही असल्याचे चोरट्यांना आधीच माहीत असावे, म्हणून चोरट्यांनी त्यांचे चेहरे झाकलेले होते. यावेळी त्यांनी दुकानातील सुमारे पाच ते सहा किलो चांदीची जुनी मोड घेऊन तेथून पोबारा केला. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे नागरिक सकाळी फिरण्यासाठी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास जाऊ लागले तेव्हा त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी या घटनेची माहिती दुकानदाराला कळविली. त्यानंतर सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, मधुकर सावंत, उपनिरीक्षक शेख आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, हा श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळला.सीसीटीव्हीत चोरटे कैद...सोनार यांनी त्यांच्या दुकानात, तसेच त्यांच्या शेजारील अन्य एका दुकानाबाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला त्याचवेळी अन्य दोन चोरटे दुकानाबाहेर उभे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे परिसरातील एका सीसीटीव्हीत चोरट्यांची कार कैद झाली. यामुळे चोरट्यांनी पळून जाण्यासाठी कारचा वापर केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.दुकानाच्या गल्ल्यातील रोकड आणि अन्य वस्तू ‘जैसे थे’...या दुकानात सोन्याचे अलंकार आणि वस्तू तिजोरीत ठेवलेल्या होत्या. मात्र, चांदीच्या अन्य वस्तू मोठ्या संख्येने दुकानात होत्या. शिवाय गल्ल्यातही चार ते पाच हजार रुपयांची रोकड होती. या वस्तूंना आणि गल्ल्यातील पैशांना चोरट्यांनी हात लावला नाही. एवढेच नव्हे, तर तिजोरीकडेही ते गेले नाही.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबाद