शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद, जालना राज्याच्या औद्योगिक विकासाचे भविष्य; गुंतवणुकदारही सकारात्मक: देवेंद्र फडणवीस 

By सुमेध उघडे | Updated: October 10, 2022 13:59 IST

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत.

औरंगाबाद: देशातील पहिला इंटीग्रेटेड सिटी प्रोजेक्ट ऑरिक सिटी औरंगाबादमध्ये आहे. येथे उद्योगांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यापुढे गुंतवणुकीचा पुढील टप्पा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना असणार आहे. राज्याचे औद्योगिक भविष्य ऑरिक सिटी आहे. येथे गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजक सकारात्मक आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टर राउंड टेबल कार्यक्रमाचे मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत. विशेषतः मराठवाड्यात आणखी गुंतवणूक वाढावी यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने इन्व्हेस्टर राउंड टेबल कार्यक्रम घेण्यात आला. यात देश विदेशातील गुंतवणूकदार आले होते. राज्य सरकार मराठवाड्यातील गुंतवणुकीसाठी आग्रही आहे. येथे ऑरिक, शेंद्रा एमआयडीसी, ड्राय पोर्ट अशा सुविधा उपलब्ध आहेत. औरंगाबाद आणि जालन्यात येणाऱ्या या इंडस्ट्रीअल भागात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे भविष्यातील गुंतवणुकीचा पुढचा टप्पा औरंगाबाद जालना असतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

औरंगाबाद, जालना गुंतवणुकीसाठी भविष्य राज्यात येणाऱ्या उद्योजकांसाठी औरंगाबाद आणि जालन्यात सर्व सुविधा उपलब्ध असणारी मोठी जागा आहे. राज्यातील गुंतवणुकीसाठी ऑरिक, शेंद्रा-बिडकीन, ड्रायपोर्ट भविष्य आहेत. हा भाग समृद्धी महामार्गास जोडलेला आहे. ऑरिक, ड्रायपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंवणूक होईल. यासाठी देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले आहे. फक्त नवीन प्रकल्प, गुंतवणूक येताच त्यात राजकारण आणू नये. रिफायनरीस विरोध होत आहे. तसा मोठा प्रकल्पांना विरोध होऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMarathwadaमराठवाडाMIDCएमआयडीसी