शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले प्लास्टिक मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 2:02 PM

एकदाच वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबला

ठळक मुद्देप्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण सिंगल युज प्लास्टिक फ्री विमानतळ म्हणून विमानतळाला मान मिळाला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता एकदाच वापरू न फे कून देण्याच्या (सिंगल युज प्लास्टिक ) वस्तूंचा वापर बंद झाला आहे. त्यामुळेच सिंगल युज प्लास्टिकमुक्त विमानतळ म्हणून नावलौकिक मिळविला आहे. प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण मिळवून विमानतळाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. यातूनच औरंगाबादचे विमानतळ पर्यावरणपूरक विमानतळ म्हणून पुढे येत आहे. 

विमानतळावर प्रवेश करीत नाही. तोच सध्या एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फलक म्हणजे ‘हे विमानतळ सिंगल युज प्लास्टिकमुक्त आहे,’ अशी माहिती देणारा आहे. हा फलक वाचून औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकाला विमानतळाच्या या कामगिरीविषयी कौतुक वाटते. हे कौतुक वाटताना प्लास्टिकचा वापर थांबविण्याची प्रेरणाही प्रवाशांना मिळते. त्यातूनच विमानतळावर प्लास्टिकमुक्तीला आणखी बळकटी मिळत आहे. देशातील २० विमानतळांवर सिंगल युज प्लास्टिकच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने थर्ड पार्टीकडून मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद विमानतळाचाही समावेश होता. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकमुक्तीसाठी परिश्रम घेतले. विमानतळाचा प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता विमानतळाने अखेर फ क्त एक दाच वापरू न फे कून देण्याच्या (सिंगल युज प्लास्टिक ) प्लास्टिक आणि अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्यात यश मिळविले. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक फ्री विमानतळ म्हणून विमानतळाला मान मिळाला आहे.

हा झाला बदलविमानतळावरील रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा वापरण्यात येणाऱ्या क्रॉकरीवर भर दिला जात आहे. प्लास्टिक, थर्माकॉलच्या कप, ग्लासऐवजी काचेचे ग्लास, चिनी मातीचे कप वापरण्यावर भर दिला जात आहे. विमानतळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीऐवजी स्वत:ची वैयक्तिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात आहे. विमानतळावरील इतर स्टॉलवर पेपर बॅग, ज्यूटच्या बॅग दिल्या जात आहेत. कागद, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, फळांच्या साली अशा कचऱ्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करून संकलन केले जात आहे. या संकलनासाठी बायोडिग्रिबल बॅग वापरल्या जात आहेत.

बॉटल क्रशिंग मशीनरेल्वेस्टेशनवर काही दिवसांपूर्वीच पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक च्या बाटल्या चिरडून टाक णारे यंत्र (बॉटल क्र शिंग मशीन) बसविण्यात आले आहे. अगदी असेच यंत्र विमानतळावर लावण्यात आलेले आहे. त्यातून टाकाऊ बाटल्यांची तुकडे केली जात आहेत.

प्लास्टिकमुक्ती पुढेही कायम ठेवणारविमानतळ सिंगल युज प्लास्टिकमुक्त झालेले आहे. ही बाब यापुढेही कायम राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबाद