शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औरंगाबाद जिल्ह्याची नजर आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:02 IST

जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने कृपादृष्टी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाऐवजी अधूनमधून नुसती रिमझिम सुरू आहे. आकाशात ढग दाटून येतात; परंतु समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देफक्त रिमझिम पाऊस : मराठवाड्यातील ४० तालुक्यांनी ओलांडली सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने कृपादृष्टी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाऐवजी अधूनमधून नुसती रिमझिम सुरू आहे. आकाशात ढग दाटून येतात; परंतु समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.मराठवाड्यातील ७६ पैकी ४० तालुक्यांमध्ये पावसाने आतापर्यंत अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील अवघ्या दोन तालुक्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या अनुक्रमे १०२.८ आणि १०४.४ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात १५४.६० तर फुलंब्री तालुक्यात १५९.७५ मिलिमीटर पाऊस झाला. अन्य सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १ जून ते ३ जुलैदरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७१.८ टक्के पाऊस झाला आहे.जून महिन्याच्या प्रारंभीच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. १ आणि २ जून असा दोन दिवस दमदार बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यानंतर जून महिना अर्धा उलटल्यावर थेट २१ जून रोजी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. आता कुठे समाधानकारक पाऊस पडेल,अशी आशा व्यक्त होत असताना पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. अवघे दोन दिवस जोरदार बरसल्यानंतर पावसाचा जोर ओसरला. जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असून, गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा केवळ अवघ्या काही मिनिटांसाठी शिडकावा होत आहे. काही दिवस पावसाचा खंडही पडल्यामुळे पावसाच्या टक्केवारीत घट झाली आहे. परिणामी शेतकºयांकडून चिंता व्यक्त होत आहे.पुढील आठवड्याची प्रतीक्षातीन दिवसांनंतर मंगळवारी (दि.३) शहर आणि परिसरात पुन्हा एकदा काही मिनिटांसाठी पावसाने हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची काहीही नोंद झाली नाही.७ जुलैनंतर जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल,असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे किमान पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.जिल्ह्यात पडलेला पाऊस (३ जुलैपर्यंत)तालुका पाऊस टक्केवारी(मि.मी)औरंगाबाद १५४.६० १०२.८फुलंब्री १५९.७५ १०४.५पैठण ८४.८० ६३.९सिल्लोड ८७.५० ५९.८सोयगाव ११४.३३ ६९.२वैजापूर ९१.७० ८६.४गंगापूर ७१.८९ ५१.३कन्नड १०२.६३ ६२.३खुलताबाद ८७.३३ ५१.३

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्र