शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी ९५ रुग्णांची वाढ, ६६ रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 1:17 PM

जिल्ह्यात १,०१८ रुग्णांवर सुरू उपचार 

ठळक मुद्देउपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू  जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,४७३ एवढी झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या ९५ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या ६६ रुग्णांना सुटी देण्यात आली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,४७३ एवढी झाली आहे. यातील ४१,३०६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १,१४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९५ रुग्णांत मनपा हद्दीतील ८३, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५९ आणि ग्रामीण भागातील ७ अशा ६६ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. बरकतपूर (ता.कन्नड) येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रूग्णरेल्वेस्टेशन परिसर १०, कमलनयन बजाज हॉस्पिटल परिसर १, गारखेडा परिसर ७, जवाहरनगर पोलीस स्टेशन परिसर १, शहागंज परिसर १, अंगुरीबाग १, साई परिसर १, एन सात बजरंग कॉलनी २, गजानन नगर, गारखेडा परिसर २, शिवाजी नगर १, अथर्व क्लासिक १, देवानगरी १, दशमेश नगर १, सातारा परिसर ३, गजानन कॉलनी १, देवळाई चौक परिसर ३, हनुमान नगर १, उत्तम नगरी, चिकलठाणा १, विमानतळ परिसर १, अलोक नगर, सातारा परिसर १, अहिंसा नगर १, कोटला कॉलनी १, जवाहर कॉलनी, विष्णू नगर ३, नवनाथ नगर १, आनंदवन सो., १, हडको एन बारा १, नारेगाव गल्ली १, एमएचबी कॉलनी, चंपा चौक १, ज्योती नगर १, एन सात सिडको १, जुना मोंढा, ढोलपुरा १, पारिजात नगर, एन चार सिडको १, सिडको १, ज्युबली पार्क १,  सन्मित्र कॉलनी १, झाल्टा फाटा १, सारा  सिटी पैठण रोड १, सुधाकर नगर १ व अन्य २२.

ग्रामीण भागातील रुग्ण : रांजणगाव शेणपुजी १, नेवपूर, कन्नड १, सरस्वती कॉलनी, गेवराई १, जिवराग टाकळी १, रांजणगाव १, अन्य ७.

८९७ नागरिकांची तपासणीमहापालिकेने मंगळवारी ८९७ नागरिकांची  टेस्ट केली. २२७ अँटिजन मधून २९ बाधित आढळले. आरटीपीसी-आर ६७०  टेस्ट केल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस