शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बोंडअळी नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्याला हवेत २०९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:56 PM

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती.पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता.तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे.

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३ लाख ८२ हजार २४० शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली होती. त्यांना बोंडअळीमुळे फटका बसला आहे. ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली होती.

पूर्वीच्या पंचनाम्यानुसार २७० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव होता. तो दुरुस्तीसह पाठविण्यात आला असून, आता २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांची नुकसानभरपाईसाठी गरज आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या ३ लाख ७३ हजार १२२ इतकी आहे. त्या शेतकर्‍यांचे ३ लाख १४ हजार ८०३ हेक्टरवरील कापसाचे पीक वाया गेले आहे. या शेतकर्‍यांना १६६ कोटी ५६ लाख ८५ हजार ९०८ रुपये भरपाईसाठी लागतील, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ४२ कोटी ८६ लाख ४४ हजार ८०० रुपये लागतील, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दिला आहे. 

या तालुक्यांतील पिकाचे नुकसानऔरंगाबाद शहर परिसरातील औरंगाबाद, भावसिंगपुरा, उस्मानपुरा, कांचनवाडीतील २,७३० शेतकर्‍यांनी लावलेल्या कापसाच्या पिकाला बोंडअळीने फस्त केले. तालुक्यातील चौका, करमाड, लाडसावंगी, हर्सूल, चित्तेपिंपळगाव, चिकलठाणा येथील ५४ हजार ८०३, पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर, बिडकीन, लोहगाव, पाचोड, पैठण, विहामांडवा, ढोरकीन, पिंपळवाडी, नांदर येथील ७६ हजार ३१७ शेतकर्‍यांचे, तर लाडगाव, लासूरगाव, शिऊर, बोरसर, नागमठाण, लोणी खु., तुर्काबाद, गंगापूर, हर्सूल, मांजरी, शेंदुरवादा, वाळूज, सिद्धनाथ वडगाव, भेंडाळा, डोणगाव या गंगापूर तालुक्यातील ९ हजार २३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. खुलताबाद तालुक्यातील सावंगी, सुलतानपूर, वेरूळ येथील २५ हजार १२९, कन्नड तालुक्यातील चापानेर, चिकलठाण, नाचनवेल येथील ३० हजार ६१७, तर सोयगाव तालुक्यातील बनोटी, सोयगाव, सावळदबारा येथील २६ हजार ७९१ शेतकर्‍यांच्या कापसाचे पीक बोंडअळीमुळे वाया गेले. 

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबाद