शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २५१ वाहनांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 20:15 IST

वाहनसंख्या पोहोंचली १३ लाखांवर 

ठळक मुद्देदुचाकींची संख्या तब्बल १० लाखअवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १३ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. महिन्याला सुमारे आठ हजार तर दररोज जवळपास २५१ नव्या वाहनांची भर पडत आहे. जुन्या आणि भंगार वाहनांनी प्रदूषणाला हातभार लागत असून, शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरण अशी औरंगाबादची ओळख नाहीशी होत आहे. 

शहराच्या लोकसंख्येएवढीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये दुचाकींची संख्या १० लाखांवर आहे. वाहनांमधून कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर सोडले जातात. त्यास लगाम लावण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पीयूसी तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांतून बाहेर पडत नाही ना, हे पाहणे हा ‘पीयूसी’चा उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात पीयूसी केवळ दंड वाचविण्यासाठीचे साधन झाले आहे. ते देणाऱ्या यंत्रणेकडून गांभीर्याने तपासणी होत  नाही. शिवाय जिल्ह्यात दुचाकींची संख्या अधिक आहे. दुचाकींनाही दरवर्षी पीयूसी तपासणी बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. 

महिन्याला ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवरजिल्ह्यात दर महिन्याला सुमारे ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वर्षाला एक लाख वाहनांची भर पडत आहे. २०१० मध्ये जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे. 

५४९ इलेक्ट्रिक दुचाकीजिल्ह्यात ५८५ इलेक्ट्रिक वाहने आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या ५४९ इतकी आहे. उर्वरित वाहने ही कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करणारी आहेत. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात त्यांची संख्या तोकडीच आहे. त्याशिवाय एकच सीएनजी वाहन आहे. 

फक्त ३६ सिटी बसशहरात आजघडीला केवळ ३६ स्मार्ट सिटी बस धावत आहे. शहराच्या तुलनेत त्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी, दुचाकी वाहन वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यातूनच वाहनांची संख्या वाढत आहे आणि वायू प्रदूषणाला हातभार लागत आहे.

मानकांप्रमाणे हवे वायूंचे प्रमाणवाहनांसाठी दिलेल्या मानकांप्रमाणे वायूंचे प्रमाण पाहिजे. त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर त्या वाहनाला पीयूसी प्रमाणपत्र दिले जात नाही. बीएस-३ वाहनांना सहा महिन्याला हे प्रमाणपत्र घ्यावे लागते, तर बीएस-४ वाहनांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील परिस्थितीएकूण वाहनांची संख्या    १३ लाख ७९ हजार ४६२दुचाकी    १० लाख ८६ हजार ५२९रिक्षा    ३४ हजार ७२७मोटार कार    ८२ हजार ४७९जीप    २९ हजार ३२२ट्रक    १५ हजार ८८३टँकर    ४ हजार ७८१ट्रॅक्टर    २९ हजार ३७६रुग्णवाहिका    ५३८मिनी बस    २ हजार १७९स्कूल बस    १ हजार १२५

असे हवे वायूचे प्रमाण- पेट्रोल वाहनकार्बन मोनोक्साईडची कमाल मर्यादा ३.५ %.हायड्रोकार्बनची कमाल मर्यादा ४५०० पीपीएम (पर पार्ट मिलियन)- डिझेल वाहनकाळ्या धुराचे प्रमाण- २.४५

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण