औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची पुण्याला बदली; सुनील चव्हाण घेणार पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:10 IST2018-04-16T13:09:38+5:302018-04-16T13:10:19+5:30
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची पुण्याला बदली; सुनील चव्हाण घेणार पदभार
औरंगाबाद : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ लाभलेले नवलकिशोर राम यांची जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत उलेखनीय काम केले. यासोबतच शहरात कचरा प्रश्न पेटल्याने तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना हटविल्यानंतर त्यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. मागील महिनाभरात यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या. दरम्यान, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप वाढल्याने ते अस्वस्थ असल्याची चर्चा होती.
जिल्हाधिकारी मिळाले, आयुक्त कधी मिळणार
जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली असली तरी मनपा आयुक्ताबाबत अद्याप काही निर्णय झाला नाही. यामुळे मनपा आयुक्तपदाची जबाबदारी परत एकदा नव्या जिल्हाधिकाऱ्यावर येणार का ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.