औरंगाबादचा रायगडवर दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:55 IST2017-12-28T00:54:56+5:302017-12-28T00:55:27+5:30
औरंगाबाद : तनुज सोळुंके याची सुरेख फिरकी गोलंदाजी आणि त्याला ऋषिकेश कुंदे, सुजल राठोड व हरिओम काळे यांची साथ या बळावर औरंगाबादने एडीसीए मैदानावर झालेल्या एमसीएच्या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रायगड संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

औरंगाबादचा रायगडवर दणदणीत विजय
औरंगाबाद : तनुज सोळुंके याची सुरेख फिरकी गोलंदाजी आणि त्याला ऋषिकेश कुंदे, सुजल राठोड व हरिओम काळे यांची साथ या बळावर औरंगाबादने एडीसीए मैदानावर झालेल्या एमसीएच्या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रायगड संघावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
संकेत पाटीलच्या ५५ धावांच्या बळावर औरंगाबादने पहिल्या डावात २१३ धावा केल्यानंतर रायगडचा पहिला डाव ५१ षटकांत १0९ धावांत गुंडाळताना त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. औरंगाबादकडून फिरकी गोलंदाज अनुज साळुंके याने २२ धावांत ६ गडी बाद केले. त्याला ऋषिकेश कुंदे याने २ तर सुजल राठोड व अंश ठोकळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद करून साथ दिली.
रायगडकडून ओम कुलकर्णी याने एकाकी झुंज देताना ७ चौकारांसह ७१ चेंडूंत ४९ धावा केल्या. फॉलोआॅननंतर रायगडने दुसºया डावात १४७ धावा फटकावताना औरंगाबादसमोर निर्णायक विजयासाठी ४४ धावांचे आव्हान ठेवले. रायगडकडून दुसºया डावात चैतन्य पाटील याने ७ चौकारांसह ४८ व मानस लाले याने २४ धावा केल्या. औरंगाबादकडून सुजल राठोडने ३५ धावांत ३ गडी बाद केले. ऋषिकेश कुंदे, अंश ठोकळ, हरिओम काळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. हे आव्हान सागर पवारच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर औरंगाबादने १ गडी गमावून ४५ धावा करीत पूर्ण केले.
सागर पवारने ६ सणसणीत चौकारांसह ३३ चेंडूंत नाबाद ३३ धावांची आक्रमक खेळी केली. पहिल्या डावात सुरेख अर्धशतकी खेळी करणारा संकेत पाटील ६ धावांवर बाद झाला, तर अंश ठोकळने नाबाद ४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
औरंगाबाद (पहिला डाव) : २१३.
दुसरा डाव : १ बाद ४५. (सागर पवार नाबाद ३३).
रायगड (पहिला डाव) : ५१ षटकांत सर्वबाद १0९. (ओम कुलकर्णी ४९, तनुज सोळुंके ६/२२, ऋषिकेश कुंदे २/१३, सुजल राठोड १/१६, अंश ठोकळ १/१0). दुसरा डाव : ४२.४ षटकांत सर्वबाद १४७. (चैतन्य पाटील ४८, मानस लाले २४. सुजल राठोड ३/३५, अंश ठोकळ २/१४, ऋषिकेश कुंदे २/१६, हरिओम काळे २/२१).