शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आपला मराठवाडा ना भाऊ... जगातील पहिल्या 5 शहरांमध्ये औरंगाबाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 08:51 IST

इटालियन मासिकाने घेतली दखल, गुंतवणूक व उत्पादन वाढीच्या दृष्टीने विकसनशील शहर

 औरंगाबाद : गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणाऱ्या ‘ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया’ या इटालियन मासिकाने नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पहिल्या पाच महत्त्वाच्या शहरांत औरंगाबादला स्थान दिले आहे.औरंगाबादसोबतच चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन ही शहरे या यादीत आहेत. ‘इनोव्हॅझिओन’च्या मते, ही शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध औद्योगिक प्रभावी आणि सर्वांत मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह सर्वांत नावीन्यपूर्ण जागतिक उत्पादनाची शहरे आहेत.

शहरांमध्ये जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह आघाडीच्या प्रयोगशाळा आणि कारखाने आहेत. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर व मोठ्या बँका यासारख्या आयसीटी, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल कंपन्यांचे उत्पादन युनिट म्हणून मुंबई-औरंगाबादचे वर्गीकरण केले आहे.

मुंबई - सर्वांत महत्त्वाची मेगा सिटीनियतकालिकाने मुंबईचे वर्गीकरण दक्षिण आशियातील सर्वांत महत्त्वाचे मेगा सिटी, जागतिक दर्जाचे आर्थिक, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र आणि प्रचंड कामगार असलेले शहर म्हणून केले आहे. जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा ५ टक्के आणि संपूर्ण भारताच्या आर्थिक व्यवहारात ७० टक्के आहे.

औरंगाबादेतील निर्यातीचे पाच वस्तू मूल्य (यूएस डॉलर दशलक्षमध्ये)nअभियांत्रिकी वस्तू १०६२.०७nऔषधी आणि फार्मास्युटिकल्स २१७.३९ nप्लास्टिक आणि लिनोलियम १४९.९ nसेंद्रिय आणि अजैविक रसायने ४३.६९

उत्पादन क्षेत्रात औरंगाबाद अव्वल‘इनोव्हॅझिओन’ या नियतकालिकाच्या अहवालात म्हटले आहे की, औरंगाबाद हे ८ लाख लोकसंख्येचे शहर असून, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या उत्पादन क्षेत्रांमध्ये हे शहर पुढे आहे. शहराच्या विस्तीर्ण औद्योगिक वसाहतींमध्ये सीमेन्स, बीएमडब्ल्यू, स्कोडा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्लांटस् आहेत. उद्योगाबरोबरच औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठदेखील आहे, जे संपूर्ण भारतातील सर्वांत लोकप्रिय विद्यापीठांपैकी एक आहे. नियतकालिकाने असा अंदाज वर्तविला आहे की, येत्या काही वर्षांत याहूनही अधिक वेगाने या शहराची वाढ होईल. विद्यार्थी आणि संशोधक देशभरातून अभ्यास करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी येथे येतात. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होईल. 

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFortगडbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल