औरंगाबाद- अहमदाबाद विमानसेवा २ सप्टेंबरपासून होणार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 18:21 IST2019-08-08T17:48:30+5:302019-08-08T18:21:33+5:30
२ सप्टेंबरपासून नवीन विमानसेवा सुरु करण्याचे ट्रु-जेटने आज जाहीर केले.

औरंगाबाद- अहमदाबाद विमानसेवा २ सप्टेंबरपासून होणार सुरु
औरंगाबाद : औरंगाबादवरून अहमदाबादसाठी २ सप्टेंबरपासून नवीन विमानसेवा सुरु करण्याचे ट्रु-जेटने आज जाहीर केले. या विमान सेवेमुळे औरंगाबादमधील पर्यटन आणि व्यापारास चांगलाच दिलासा मिळाला आहे.
सर्व सुविधेने सज्ज असलेल्या औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मागील काही दिवसांपासून नवी उड्डाणे होते नव्हती. औरंगाबादहून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, दिल्ली आणि मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळत नसल्याने त्या प्रलंबित आहेत. यासोबतच इतर ठिकाणावरून सुद्धा विमानसेवा सुरु होण्याचा केवळ घोषणाच होत होत्या. यातच ट्रु-जेट कंपनीने पर्यटकांची गरज लक्षात घेत औरंगाबादहून अहमदाबादसाठी आठवड्यातून चार दिवस विमान सेवा सुरु करण्याचे जाहीर केले. ही विमानसेवा २ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या नव्या विमानसेवेने औरंगाबादकरांना तसेच देश विदेशातील पर्यटक आणि व्यापाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
मुंबई, दिल्ली विमानतळांकडून उड्डाणाची वेळ हवी https://t.co/NcH636aOfm
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 31, 2019