त्या वाळूसाठ्याचा लिलाव बुधवारी
By Admin | Updated: April 7, 2015 01:28 IST2015-04-07T01:10:50+5:302015-04-07T01:28:06+5:30
पाचोड : पाचोड पोलिसांनी वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलाव बुधवारी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती पैठणचे तहसीलदार संजय पवार यांनी दिली.

त्या वाळूसाठ्याचा लिलाव बुधवारी
पाचोड : पाचोड पोलिसांनी वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलाव बुधवारी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती पैठणचे तहसीलदार संजय पवार यांनी दिली.
पाचोड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भगवान धबडगे, फौजदार संपत पवार, रमेश खुणे यांनी विनापरवाना चोरून वाळू वाहतूक होत असताना वाळूच्या वाहनावर कारवाई केली होती, तसेच गुन्हे दाखल करून ही वाळू जप्त केली होती.
सोमवारी संजय पवार यांनी पाचोड पोलीस ठाण्याला भेट दिली. जप्त केलेल्या वाळू साठ्याचा पंचनामा केला. यावेळी स.पो.नि. भगवान धबडगे, मंडळाधिकारी बी.ए. गरकळ, तलाठी चंदेल ठाकूर आदी हजर होते.
तहसीलदार पवार यांनी पाचोड गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी गावात किती टँकर येतात. टँकरच्या किती खेपा होतात. जे पाणी पाचोडकरांना टँकरमधून मिळते ते जनतेला पुरते की नाही याची चौकशी केली.
ते म्हणाले की, टंचाईग्रस्त गावांतील जनतेने आपल्या गावात किती टँकर येतत व किती खेपा होतात याकडे लक्ष द्यावे. टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकर सुरू आहे; पण गावात टँकरच येत नाही असे असल्यास गावकऱ्यांनी तात्काळ पैठण तहसीलदार किंवा गटविकास अधिकाऱ्याकडे संपर्क साधावा.
यावेळी सरपंच अंबादास नरवडे, राजू भुमरे यांची उपस्थिती होती.