भद्रा मारुती संस्थानच्या सचिवपदी अतुल सावे, उपाध्यक्षपदी बारगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:31+5:302021-06-09T04:06:31+5:30

खुलताबाद येथे भद्रा मारुती मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक विश्वस्त माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. ...

Atul Save as Secretary of Bhadra Maruti Sansthan, Bargal as Vice President | भद्रा मारुती संस्थानच्या सचिवपदी अतुल सावे, उपाध्यक्षपदी बारगळ

भद्रा मारुती संस्थानच्या सचिवपदी अतुल सावे, उपाध्यक्षपदी बारगळ

खुलताबाद येथे भद्रा मारुती मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक विश्वस्त माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, मावळते सचिव कचरू पा. बारगळ, मावळते उपाध्यक्ष आ. अतुल सावे, कार्याध्यक्ष किशोरशेठ अग्रवाल, कोषाध्यक्ष पोपट जैन, विश्वस्त भूषण अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, रामकिसन धूत, लक्ष्मण फुलारे, खंडेराव बारगळ, रामनाथ बारगळ तसेच जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे उपस्थित होते. बैठकीत आ. अतुल सावे यांना मंदिर संस्थानच्या सचिवपदी, तर रामनाथ ऊर्फ बाबासाहेब तुकाराम बारगळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो कॅप्शन : खुलताबाद येथील भद्रा मारुती संस्थानच्या सचिवपदी आ. अतुल सावे, तर उपाध्यक्षपदी रामनाथ बारगळ यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना विश्वस्त माजी खा. चंद्रकांत खैरे, अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ.

Web Title: Atul Save as Secretary of Bhadra Maruti Sansthan, Bargal as Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.