सुटीच्या दिवशी केंद्रप्रमुखांची ‘हजेरी’

By Admin | Updated: December 22, 2014 01:03 IST2014-12-22T00:37:28+5:302014-12-22T01:03:06+5:30

बीड : शिक्षण विभाग सीईओ नामदेव ननावरे यांच्या टार्गेटवर असून रविवारी त्यांनी केंद्रप्रमुखांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले.

'Attendance' of center-chief on holidays | सुटीच्या दिवशी केंद्रप्रमुखांची ‘हजेरी’

सुटीच्या दिवशी केंद्रप्रमुखांची ‘हजेरी’


बीड : शिक्षण विभाग सीईओ नामदेव ननावरे यांच्या टार्गेटवर असून रविवारी त्यांनी केंद्रप्रमुखांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले.
शनिवारी ननावरे यांनी बीड शहर परिसरातील शाळांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांना काही शाळांवर मोजकेच विद्यार्थी, शिक्षक आढळले होते. त्यामुळे ननावरे यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बीड तालुक्यातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची बैठक बोलाविली होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव यांची उपस्थिती होती. गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा असे सांगून ननावरे यांनी उणिवांवर बोट ठेवले. शिक्षकांनी शिस्त पाळली पाहिजे, जे शिस्त पाळणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सूचन इशाराही त्यांनी दिला. स्वच्छता मोहीम गतिमान करुन शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सीईओ ननावरे यांनी शिस्तीचे डोस पाजल्यामुळे इतर तालुक्यातील केंद्र प्रमुखांनाही हादरा बसला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Attendance' of center-chief on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.