शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पोलीस आयुक्तालयात गोपनीय शाखेतील कागदपत्रांच्या शूटिंगचा प्रयत्न; एकजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 12:23 IST

Commissioner of Police Aurangabad News : पोलीस आयुक्त इमारतीचे व परिसराचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.

ठळक मुद्देपत्रकार असल्याची बतावणी करून केली घुसखोरीसहायक पोलीस निरीक्षकांशी अरेरावी, गुन्हा दाखल

औरंगाबाद : पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ( Commissioner Of Police Aurangabad) थेट घुसखोरी करून तेथील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत गोपनीय शाखेतील कागदपत्रांचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. हा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता घडला. पोलिसांनी त्याला अटक करीत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( Attempted shooting of confidential branch documents at the Commissioner of Police Aurangabad ; One in custody) 

सय्यद निहाल अहेमद सय्यद शकील अहेमद (४०, रा. नागसेन कॉलनी, राेशनगेट) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता आले. रिसेप्शनवरील महिला कर्मचारी मनीषा जगताप यांना पत्रकार असल्याचे सांगून, आयुक्त साहेबांना भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांना थोडा वेळ बसण्यास सांगून जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना घटनेची कल्पना दिल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. रोडे यांच्याशी बोलताना त्यांनी अरेरावीची भाषा केली. तसेच रोडे यांना ते गोपनीय शाखेतील कागदपत्रांची व्हिडिओ शूटिंग मोबाइलमध्ये करीत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा - भोगले ऑटोमोटिव्ह हल्ला प्रकरण : कामगाराने बाजू मांडली; तब्बल २२ दिवस पार्किंगमध्ये बसवून ठेवले

रोडे यांनी मोबाइल ताब्यात घेतला असता, त्यात विनापरवानगी गोपनीय शाखेचे शूटिंग केल्याचे व्हिडिओ आढळून आले. पोलीस आयुक्त इमारतीचे व परिसराचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. याविषयीच्या सूचनाही कार्यालयात लावण्यात आलेल्या असताना थेट पोलीस आयुक्तांच्या दालनातच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेबाबत मनीषा जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सय्यद निहाल अहेमद सय्यद शकील अहेमद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Commissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी