उपोषणार्थी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: August 17, 2014 00:20 IST2014-08-17T00:20:39+5:302014-08-17T00:20:39+5:30
हिंगोली : तालुक्यातील जोडतळा प्रकरणातील पीडित महिलेने स्वातंत्र्यदिनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

उपोषणार्थी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
हिंगोली : तालुक्यातील जोडतळा प्रकरणातील पीडित महिलेने स्वातंत्र्यदिनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जोडतळा येथील मंगलाबाई सूंदरसिंग पवार (वय ४८) या महिलेने खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करावी यासह नऊ मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. दरम्यान, स्वत:जवळील कॅनमधील केरोसीन अंगावर ओतून तिने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सपोउपनि धोंडिबा ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून सदरील महिलेविरूद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. १५ रोजी ३0 उपोषणाचे तंबू बसले होते. त्यापैकी ५ ते ६ शनिवारी सायंकाळपर्यंत बसलेलेच होते. यात हिवरा जाटूचे सर्जेराव शिंदे, बाभळीचे संतोष पर्वत, खांडेगावच्या विमल पांचाळ, लालसेनेच्या मुन्ना पवार व इतर कार्यकर्ते तसेच मंगल पवार पुन्हा उपोषणास बसल्या आहेत. तर मतदनीस अविनाश दवणेचे उपोषण सुटले. (प्रतिनिधी)