खुनाचा प्रयत्न; पाच आरोपींना सक्त मजुरी
By Admin | Updated: August 1, 2014 00:29 IST2014-08-01T00:17:23+5:302014-08-01T00:29:59+5:30
जालना : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन दामोदर शेंडगे, ज्ञानेश्वर सखारात शेंडगे, सखाराम गंगाधर शेंडगे, गोविंद अर्जुन शेंडगे व नारायण गंगाधर शेंडगे या पाच आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

खुनाचा प्रयत्न; पाच आरोपींना सक्त मजुरी
जालना : खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन दामोदर शेंडगे, ज्ञानेश्वर सखारात शेंडगे, सखाराम गंगाधर शेंडगे, गोविंद अर्जुन शेंडगे व नारायण गंगाधर शेंडगे या पाच आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. देशमुख यांनी दिला आहे.
या आरोपींपैकी अर्जुन शेंडगे, ज्ञानेश्वर शेंडगे व सखाराम शेंडगे यांना चार वर्षे सक्तमजुरी व गंभीर दुखापत केल्याच्या आरोपावरून एक वर्षे शिक्षा तसेच आरोपी गोविंद शेंडगे व नारायण शेंडगे यांना प्रत्येकी एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रत्नमाला अनिल शर्मा (वय ३५ वर्षे रा.ढाकलगाव ता.अंबड ) यांनी फिर्यादी दिली की, १२ सप्टेंबर २०११ रोजी रत्नामाला ही त्यांच्या शेतात गट नंबर १८७ मध्ये काम करीत होती, त्यांच्या सोबत त्यांचे पती अनिल शर्मा, व मनोज जगताप व संतोष हजर होते. आमच्या शेतातील मोसंबी तोडू नका या कारणावरून आरोपी गोविंद अर्जुन शेंडगे, अर्जुन दामोदर शेंडगे, ज्ञानेश्वर सखाराम शेंडगे, नारायण गंगाधर शेंडगे व सखाराम गंगाधर शेंडगे यांनी फिर्यादीस व साक्षीदारांना शिवीगाळ केली व साक्षीदारांना लाकडी दांड्याने मारहाण केली व आरोपी सखाराम याने रत्नमालास हिस ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या तोंडात विषारी द्रव टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी विरूध्द गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन वरीलप्रमाणे निर्णय देण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)