दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:23 IST2019-09-02T23:23:36+5:302019-09-02T23:23:50+5:30

तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Attack on young man for not paying for alcohol | दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला

दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला

वाळूज महानगर : दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे २१ वर्षीय तरुणावर हल्ला करुन लोखंडी रॉडने डोके फोडल्याची घटना रविवार (दि.१) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. या हल्याप्रकरणी तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बंटी भास्कर होर्शिळ (२१ रा.तीसगाव परिसर) हा रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र शाम मोरेसोबत बजाजनगरातील साई हॉस्पीटल समोर उभा होता. यावेळी रवी मुकुमल, योगेश प्रधान व अक्षय काळे हे बंटी व त्याच्या मित्राजवळ येऊन रवीने बंटीला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. बंटीने नकार दिल्यामुळे रवीने त्याला मारहाण केली. तसेच योगेश व अक्षय यानेही मारहाण केली.

शाम मोरे मारहाणीच्या भितीमुळे पळून गेला. बंटीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बंटी होर्शिळ याच्या तक्रारीवरुन रवी मुकुटमल, योगेश प्रधान व अक्षय काळे या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attack on young man for not paying for alcohol