राहूल मोटेंच्या कारवर हल्ला

By Admin | Updated: March 2, 2015 00:52 IST2015-03-02T00:48:26+5:302015-03-02T00:52:00+5:30

भूम : सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावाकडे परतणारे राष्ट्रवादीचे आमदार राहूल मोटे यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या़ ही घटना

Attack on the car of Rahul Mot | राहूल मोटेंच्या कारवर हल्ला

राहूल मोटेंच्या कारवर हल्ला


भूम : सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावाकडे परतणारे राष्ट्रवादीचे आमदार राहूल मोटे यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या़ ही घटना जांब गावाजवळ नगर मार्गावर शनिवारी रात्री घडली़ या प्रकरणी आ़ मोटे यांनी दगडासारखी वस्तू कारवर फेकून मारल्याची तक्रार आ़ मोटे यांनी भूम पोलीस ठाण्यात दिली आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जांब येथे शिवजन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते़ या कार्यक्रमाच्या पारितोषिकाचे वितरण करण्यासाठी आ़ राहूल मोटे व त्यांचे सहकारी शनिवारी सायंकाळी जांब येथे गेले होते़ पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आ़ मोटे व त्यांचे सहकारी हे त्यांच्या कारमधून (क्ऱएम़एच़२५- यू़ ७७७) परतत होते़ त्यांची कार जांब गावापासून पुढे नगर मार्गावर आली असता अचानक त्यांच्या कारवर हल्ला झाला़ यात कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फुटल्या असून, सुदैवाने कोणी जखमी झाले नाही़ या प्रकाराबाबत आ़ मोटे यांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, दगडासारखी वस्तू गाडीवर फेकून मारल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Attack on the car of Rahul Mot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.