लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर अत्याचार; पुण्याच्या तरुणाविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:23 PM2021-05-05T19:23:06+5:302021-05-05T19:23:43+5:30

crime news in auranagabad नातेवाईकांच्या लग्नात आरोपीची आणि तरुणीची २०१६ साली भेट झाली होती.

Atrocities on young women by luring them into marriage; A case has been registered against a Pune youth in Aurangabad | लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर अत्याचार; पुण्याच्या तरुणाविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल 

लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर अत्याचार; पुण्याच्या तरुणाविरुद्ध औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्दे लग्नाचे वचन तोडून त्याने मार्च महिन्यात दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले.

औरंगाबाद: लग्नाच्या आमिषाने प्रियसीला औरंगाबाद शहरातील लॉजवर आणि पुणे, महाबळेश्वर येथे नेऊन अत्याचार करणाऱ्या पुण्याच्या तरुणाविरुध्द सिटीचौक पोलिसानी मंगळवारी गुन्हा नोंदविला.

आकाश कोंडीराम जाधव (३०,रा.खराडी,पुणे, मूळ रा. इंदापुर सांवगी, ता. खुलताबाद,) असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार पिडिता शहरात खाजगी नोकरी करते. तिच्या नातेवाईकांच्या लग्नात आरोपीची आणि तिची २०१६ साली भेट झाली होती. तेव्हा त्यांनी परस्परांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. यातून त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यादरम्यान आरोपी औरंगाबादेत तिला भेटायला आला होता. तेव्हा त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. यानंतर त्याने तिला पुणे, महाबळेश्वर आदी ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यासोबत शारीरिक सबंध प्रस्थापित केले. 

दरम्यान, तिला दिलेले लग्नाचे वचन तोडून त्याने मार्च महिन्यात दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. तेव्हापासून तो तिला टाळू लागला. तिचे फोन कॉल घेत नव्हता. ही बाब पिडितेला खटकली. यानंतर तिने अधिक चौकशी केल्यावरच त्याने लग्न केल्याचे तिला कळाले. या नंतर पिडितेने काल सिटीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी आकाश विरूध्द बलात्काराचा गुन्हा नोंदविला. फौजदार सय्यद बाबर हे या गुंह्याचा तपास करीत आहेत.
 

Web Title: Atrocities on young women by luring them into marriage; A case has been registered against a Pune youth in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.